Revenue Department Vacancy: राज्यातील जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे जलद गतीने आणि पारदर्शक पद्धतीने निकाली काढण्यासाठी १५०० खासगी भूमापकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे जमीनधारकांना मोठा दिलासा मिळणार असून, अर्ज केल्यानंतर अवघ्या महिनाभरात जमीन मोजणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले आहे..प्रायोगिक तत्त्वावर १५० खासगी भूमापक नेमण्याचा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर आता संपूर्ण राज्यभरात खासगी भूमापकांची नियुक्ती केली गेली आहे. भूमिअभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्याने नियुक्त होणाऱ्या खासगी भूमापकांना थेट कामावर न पाठवता त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे..Revenue Officer Corruption: उपळाईचा मंडल अधिकारी लाच घेताना अटकेत.छत्रपती संभाजीनगर येथील प्रशिक्षण केंद्रात तीन महिन्यांचे तांत्रिक तसेच प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण आणि नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागणार असून, त्यानंतर हे भूमापक प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतील..राज्यातील प्रलंबित जमीन मोजणी प्रकरणांचा भार कमी करण्यासाठी जिल्हानिहाय भूमापकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. मोठ्या जिल्ह्यांना प्रत्येकी १०० खासगी भूमापक तर लहान जिल्ह्यांना प्रत्येकी ५० भूमापक दिले जाणार आहेत. या सर्व नियुक्त्या मानधन तत्त्वावर केल्या जाणार असल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले..Shetkari Mitra Recruitment: ‘शेतकरी मित्र भरतीत कृषी पदवीधरांना प्राधान्य’: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे.जमीन मोजणीसाठी नागरिकांकडून वाढत्या प्रमाणात अर्ज दाखल होत असून, विद्यमान मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी खासगी भूमापकांची नियुक्ती हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. त्यामुळे शेतकरी, जमीनधारक आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित नागरिकांना मोठा फायदा होणार आहे..पुण्यासाठी आणखी ४० भूमापकपुणे शहर आणि जिल्ह्यात जमीन मोजणीच्या अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने येथे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पुण्यात यापूर्वीच एका खासगी एजन्सीमार्फत ५० भूमापक कार्यरत आहेत. मात्र वाढता कामाचा ताण लक्षात घेऊन भूमिअभिलेख विभागाने पुण्यासाठी आणखी ४० खासगी भूमापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.