Maharashtra Government GR: महाराष्ट्रातील अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना सणांसाठी देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना आता दिवाळीसह इतर सणांसाठी २० हजार रुपये अग्रिम रक्कम मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय वित्त विभागाने जारी केला आहे..अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम क्र.१४२ (जे) अनुसार देण्यात येणाऱ्या सण अग्रिमाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ जानेवारी २००६ पासून सुधारित करण्यात आलेल्या वेतन संरचनेतील ज्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन ४,८०० रुपयांपेक्षा अधिक नाही, अशा कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये सण अग्रिम अनुज्ञेय राहील, असे शासन निर्णयात म्हटले आहे..Government Employees DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात २ टक्के वाढ.सण अग्रिम फक्त पुढील सणांना तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणांसाठीच अनुज्ञेय राहणार आहे. १. दिवाळी२. रमजान ईद३. ख्रिसमस४. पारसी नववर्ष५. संवत्सरी६. रोश-होशना७. वैशाखी पौर्णिमा (भगवान बुद्ध जयंती)८. स्वातंत्र्य दिन९. प्रजासत्ताक दिन१०. डॉ. आंबेडकर जयंती.ST Employees Diwali Bonus: एसटी कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये दिवाळी बोनस, मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा.सण अग्रिम मंजुरी आणि वसूलीच्या अटी व शर्ती पूर्वी विहित केल्याप्रमाणेच राहणार आहेत. हे आदेश जारी केल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील. त्यासाठी मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम क्रमांक १४२ (जे) मध्ये योग्य ती सुधारणा यथावकाश करण्यात येईल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.