Pune News: जमीन मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर साधारणतः दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागत आहे. राज्यामध्ये ई- मोजणी व्हर्जन २.० प्रणाली लागू करण्यात आली असून, त्यासाठी जमीन मोजणीसाठी रोव्हर यंत्रणा आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने १ हजार २०० रोव्हर खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे जमीन मोजणीची प्रकरणे लवकरात लवकर निकाली निघण्यास मदत होणार आहे, अशी माहिती भूमि अभिलेख विभागाच्या सूत्रांनी दिली..जमीन मोजणीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी भूमि अभिलेख विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. मोजणी करताना जीपीएस रीडिंग घेण्यासाठीचा वेळ कमी करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने राज्यात ७७ ठिकाणी.Land Measurement : जमीन मोजणी प्राधान्यक्रमाने होणार.कॉर्स (कंन्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारले आहे, तर कॉर्स आधारे जीपीएस रीडिंग फक्त ३० सेकंदात घेता येणार आहे. कॉर्सचे रीडिंग रोव्हर रिसिव्ह घेत असून, हे रीडिंग टॅबमध्ये दिसते. राज्यात भूमि अभिलेख विभागाची एकूण ३५५ कार्यालये असून, या सर्वच कार्यालयांमध्ये रोव्हर मशिन उपलब्ध करून देण्यास भूमिअभिलेख विभागाने पुढाकार घेतला आहे..Rover Technology : भूकरमापकांना मोजणीसाठी रोव्हर यंत्रणा पुरविणार.अक्षांश रेखांशासह मोजणी नकाशा डिजिटल स्वरूपात ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिला जात आहे. राज्यातील प्रलंबित मोजणी प्रकरणांचा जलद गतीने व मुदतीत निपटारा करण्यासाठी रोव्हर्स मशिन खरेदी करण्यास शासनाने मान्यता दिल्यामुळे नियमित मोजणी व जलद मोजणी, अशा दोन्ही वर्गवारीतील जमीन मोजणींची प्रकरणे लवकर निकाली निघण्यास मदत होणार आहे..मागणीनुसार रोव्हर मिळणारराज्यात सुमारे तीन हजार भूकरमापक आहे. या सर्वांना टप्प्याटप्याने रोव्हर मशिन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यापूर्वी भूमिअभिलेख विभागाने ५०० रोव्हर खरेदी केले आहेत. आता बाराशे रोव्हर खरेदीस मान्यता मिळाली आहे. रोव्हर मशिन हे प्राधान्याने ज्या तालुक्यांमध्ये सर्वाधिक प्रकरणे प्रलंबित आहे. त्याठिकाणी दिले जाणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.