Maharashtra State Guest Transport System Upgrade: महाराष्ट्रात भेट देणाऱ्या अति महत्त्वाच्या व्यक्ती, राज्य अतिथी आणि अन्य मान्यवरांच्या वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने ४४ नवीन वाहने खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी १२ कोटी ६८ लाख ६४ हजार ३४२ रुपयांच्या अंदाजित खर्चास मंजुरी देण्यात आली आहे..राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व न्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, तसेच देश-विदेशांतील अन्य महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असतात. या मान्यवरांच्या वाहतुकीची व्यवस्था शासकीय परिवहन सेवा आणि संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांच्या माध्यमातून केली जाते. याशिवाय, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांनी वेळोवेळी घोषित केलेल्या राज्य अतिथींच्या वाहतूक व्यवस्थेची जबाबदारीही या यंत्रणांवर असते. त्यांच्यासाठी ही वाहने खरेदी केली जाणार आहेत..Maharashtra Government Departments: सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे तीन स्वतंत्र विभाग.विशेष म्हणजे, राज्यातील सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि यापूर्वी जाहीर करण्यात आलेली काटकसर मोहीम या पार्श्वभूमीवर ही खरेदी केली जात आहे..इनोव्हा क्रिस्टासह लँड क्रूझरचाही समावेशप्रस्तावित खरेदीत ३२ टोयोटा इनोव्हा क्रिस्टा, दोन टोयोटा फॉर्च्युनर, एक टोयोटा लँड क्रूझर ३००, सात मारुती सुझुकी एर्टिगा, एक टोइंग वाहन आणि एका अर्बानिया बसचा समावेश आहे. उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात येणाऱ्या मान्यवरांसाठी टोयोटा लँड क्रूझर ३०० या वाहनाची अंदाजित किंमत चार कोटी सात लाख ६८ हजार रुपये आहे. इनोव्हा क्रिस्टा वाहनांसाठी वाहतूक खर्चासह सहा कोटी ७९ लाख ८२ हजार ६४२ रुपयांचा अंदाजित खर्च प्रस्तावित आहे..मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांसाठी शासकीय परिवहन सेवेकडे ६४ वाहनांचा आढावा मंजूर करण्यात आला आहे. तर, मुंबई व मुंबई उपनगर वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये मान्यवरांच्या वाहतुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयांकडे २२५ वाहनांचा आढावा मंजूर आहे..Government Recruitment: सरळसेवा पदभरतीत होणार बदल? सरकारचा महत्त्वाचा निर्णय.जुनी वाहने ठरत होती अडचणीचीउपलब्ध वाहनांपैकी काही वाहने नादुरुस्त झाल्याने आणि काहींचे आयुर्मान संपल्याने ती निर्लेखित करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयांतील राजशिष्टाचार शाखेकडील अनेक वाहने जुनी झाल्यामुळे त्यांचा दर्जाही योग्य राहिलेला नाही. नवीन वाहने उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि मंत्र्यांच्या कार्यालयांकडूनही सातत्याने पाठपुरावा केला जात होता, असे शासन निर्णयात म्हटले आहे..या पार्श्वभूमीवर मुंबईत शासकीय परिवहन सेवेसाठी १० वाहने, तर जिल्हाधिकारी कार्यालयांच्या राजशिष्टाचार शाखेसाठी पहिल्या टप्प्यात ३४ वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. ही वाहने केंद्र सरकारच्या गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (जेम) पोर्टलवरून एकल स्रोत पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहेत. खरेदी करताना निधीची उपलब्धता, निर्धारित किमतींच्या मर्यादा आणि शासनाच्या प्रचलित खरेदी नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.