FMD eradication efforts in Maharashtra: महाराष्ट्र राज्य लाळ्या खुरकूत मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असून, सलग आठ लसीकरण मोहिमेनंतर आता ९ व्या टप्प्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी मे अखेरपर्यंत राज्याला १ कोटी १९ लाख लस मात्रा उपलब्ध होणार असून, लसींच्या सुरक्षित साठवणुकीसाठी आणि वितरणासाठी नियोजन सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली..लसींचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी नव्याने २० ‘वॉक-इन कोल्ड-रूम’ उभारण्यात आल्या असून, प्रत्येक शीतगृहात सुमारे तीन लाख लस मात्रा साठविण्याची क्षमता आहे. याशिवाय विद्यमान शीतगृहांचाही पूर्ण क्षमतेने वापर करण्यात येणार आहे..livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण .आतापर्यंत लाळ्या खुरकूत लसीकरणाच्या आठ फेऱ्या यशस्वीपणे पूर्ण झाल्या असून, प्रभावी लसीकरणामुळे राज्यात अलीकडील काळात रोगाचा उद्रेक आढळलेला नाही. .Livestock Health Crisis: पुणे जिल्ह्यात पशुधनास उष्माघाताचा धोका.सलग दोन वर्षे रोगप्रादुर्भाव न झाल्यास महाराष्ट्राला ‘लाळ्या खुरकूत रोगमुक्त’ दर्जा मिळण्याची शक्यता असून, त्यामुळे दुग्ध, मांस आणि अंडी यांसारख्या पशुजन्य उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळू शकते..जिल्हानिहाय लस साठवण क्षमता तपासून माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत. तसेच ऑगस्ट २०२६ पासून प्रत्यक्ष लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी विभागाने तयारी सुरू केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.