Maharashtra Fodder Shortage: राज्यात चाराटंचाई; उसावर मदार
Fodder Management Decision: राज्यात सध्या १८८ दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध असला, तरी जालना आणि बीड जिल्ह्यांत केवळ ६५ दिवसांचा चारा उपलब्ध आहे. तालुकानिहाय चाऱ्याची उपलब्धता कमी असल्याने चाऱ्यासाठी उसाचा वापर करण्याचा निर्णय मंगळवारी (ता. २९) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.