Flood Compensation Status for Farmers: मागील वर्षी याच आठवड्यात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यातील उंदरगाव, केवड, वाकाव, दारफळसह नदीकाठच्या गावांमध्ये शेती, घरे, पशुधन, दुकाने तसेच रस्ते-पुलांचे मोठे नुकसान झाले. पंचनामे करण्यात आले, मदतीच्या घोषणाही झाल्या. मात्र, वर्ष उलटूनही अनेक पूरग्रस्तांना नुकसानभरपाई मिळालेली नाही..पुराच्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केवड येथील शेतकरी दत्तात्रय धर्मे यांच्या शेतात पाहणी केली होती. अतिवृष्टीचे निकष व पंचनाम्यांच्या आधारे मदत दिली जाईल, तसेच शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या ठिकाणी पुनर्वसनाचा प्रश्न असल्याने त्यानुसार मदत केली जाईल, असे सांगितले होते..Farmer Relief Decision: दुष्काळी परिस्थितीच्या आढाव्यानंतर मदत देणार: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे.मात्र, दत्तात्रय धर्मे यांनाही वर्षानंतर भरपाई मिळालेली नाही. धर्मे यांच्या नदीकाठच्या चार एकर शेतीत पुरामुळे मोठे खड्डे पडून खडकाळ भाग निर्माण झाला आहे. मनरेगातून जमीन पूर्ववत करण्यासाठी कामे करून देण्याचे सांगण्यात आले; मात्र प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याचे धर्मे यांनी सांगितले..घोषणांनंतर पाठपुरावा कुठे?पूरग्रस्तांच्या म्हणण्यानुसार, पुरानंतर मदतीच्या घोषणा झाल्या; मात्र त्यानंतर खासदार, आमदार, ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणांकडून अपेक्षित पाठपुरावा झाला नाही..Maharashtra Drought: दुष्काळ परिस्थितीवर उपाययोजना सुरु, शेतकऱ्यांना सरसकट मदत देणार- मुख्यमंत्री फडणवीस.केवड पुलाची दुरवस्थाचउंदरगाव-केवड पूल तसेच उंदरगाव-वाकाव रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न कायम आहे. दुकानदारांच्या नुकसानभरपाईचे प्रस्ताव निधीअभावी प्रलंबित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे..अनेकांचे संसार उद्ध्वस्तउंदरगाव, केवड, वाकाव परिसरातील अनेक घरांमध्ये टीव्ही, फ्रिज, धान्य, कपडे व घरगुती साहित्याचे नुकसान झाले. मोलमजुरी करून उभे केलेल्या संसारावर पुराचे पाणी फिरल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक फटका बसला आहे..पशुपालकांसाठीचे धनादेश प्राप्त झाले असून, ज्यांचे पशुधनाचे टॅग उपलब्ध आहेत, अशा पशुपालकांना मदत वितरित करण्यात आली आहे. काही प्रकरणांत अडचण असल्यास ती संबंधित पातळीवर राहिलेली असू शकते. दुकानदारांचे पंचनामे उशिरा झाल्याने त्यांचे प्रस्ताव नंतर प्राप्त झाले. त्या वेळी निधी उपलब्ध नव्हता. त्यानंतर प्राप्त झालेल्या प्रस्तावांनुसार निधीची मागणी करण्यात आली आहे.संजय भोसले, तहसीलदार, माढा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.