Farm Loan Waiver Decision: राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीला अखेर मुहूर्त मिळाला असून मंगळवारी (ता. २) होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीचा प्रस्ताव सादर होणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबरोबरच कर्जमुक्ती देण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने तयार केलेल्या अहवालात शेतकऱ्यांसाठी नेमकी कोणती पोतडी खोलणार आहे, याची उत्कंठा आहे. .‘‘महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू,’’ असे आश्वासन दिले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंतर महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल, अशी अपेक्षा होती. मात्र राज्य सरकारने कानाडोळा केल्यानंतर माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता..Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक .त्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान राज्य सरकारने जूनअखेर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही सरकारने कोणतीच पावले न उचलल्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्व पक्षीय आमदारांनी विविध आयुधांद्वारे कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला होता..अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू, असे जाहीर केले होते. या कर्जमाफीचे अटी आणि निकष मात्र जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे नेमका कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार या बाबत संदिग्धता होती..राज्य सरकारने नेमलेल्या समितीमध्ये सहकार कृषी, पणन खात्यांचे मंत्री आणि संबंधित विभागांचे सचिव ही सहभागी होते. मात्र, शेतकऱ्यांची माहिती संकलित करणे आणि अटी व निकष ठरविण्यामध्ये राजकीय पातळीवरती कोणताही हस्तक्षेप समितीने करून घेतला नाही. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया मुख्यमंत्री कार्यालयातूनच पार पडली. जो सहकार विभाग कर्जमाफीची अंमलबजावणी करणार आहे, त्या सहकार विभागाच्या मंत्र्यांनाही या बाबत माहिती देण्यात आली नाही. प्रशासनाने तयार केलेला अहवाल मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवण्यात येणार असून त्यास मंजुरी घेतल्यानंतर तो सार्वजनिक करण्यात येणार आहे..Farmer Loan Waiver : तामिळनाडू सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; १४.२२ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी.प्रोत्साहन अनुदानाबाबत उत्सुकतासलग तीन वर्षे नियमित कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना मागील दोन कर्जमाफीमध्ये प्रोत्साहन पर अनुदान देण्यात आले होते. मात्र, या कर्जमाफीमध्ये मागील तीन वर्षांमध्ये एकदा कर्ज परतफेड केल्यासही प्रोत्साहन अनुदानाचा लाभ घेण्याबाबतची तरतूद करण्यात आल्याची माहिती एका मंत्र्यांनी दिली..अखेरच्या टप्प्यात कृषिमंत्र्यांची घोषणागेल्या अनेक दिवसांपासून कृषिमंत्री भरणे आणि अन्य मंत्र्यांकडे विचारणा केली असता त्यांनी ‘‘कर्जमाफी बाबतचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत,’’ असे सांगत कोणतीही माहिती सांगण्यास नकार दिला होता. मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेत कृषिमंत्री भरणे यांनी ‘‘मी कृषिमंत्री आहे, मला इतके तरी जाहीर करू द्या,’’ असे सांगत या आठवड्यामध्ये कर्जमाफी करण्यात येईल, अशी घोषणा केली होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.