Agriculture Department Action: राज्यात बोगस व निकृष्ट बियाण्यांच्या तक्रारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांचे पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या समितीचे अध्यक्ष म्हणून तालुका कृषी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, तक्रार प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांच्या आत प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करणे समितीला बंधनकारक राहणार आहे..समितीत कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र किंवा कृषी विज्ञान केंद्र यांपैकी एका संस्थेचा प्रतिनिधी, उपलब्धतेनुसार ‘महाबीज’चा प्रतिनिधी, तसेच गुणनियंत्रण विभागाचा कृषी अधिकारी सदस्य-सचिव म्हणून काम पाहणार आहे..Soybean Seeds Complaints: सोयाबीन बियाण्यांविरोधात तक्रारींचा पाऊस.तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित बियाणे कंपनीचा प्रतिनिधी आणि विक्रेता यांनी तपासणीवेळी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. शेतकऱ्यांकडील खरेदी पावत्यांची पडताळणी करून विहित नमुन्यात पंचनामा केला जाईल. तसेच संबंधित बियाण्यांच्या लॉटचे नमुने अधिसूचित प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. यामुळे तक्रारींची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर नियमानुसार कारवाई करणे सुलभ होईल, असा कृषी विभागाचा दावा आहे..Fake Soybean Seed: सोयाबीन बोगस बियाण्यांविरोधात ११४५ वर शेतकऱ्यांच्या तक्रारी.तालुक्यात बियाण्यांच्या तक्रारींची संख्या १०० पेक्षा अधिक झाल्यास आवश्यकतेनुसार अतिरिक्त तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना तातडीने समित्या गठित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत..पंचनाम्याची प्रत देणे अनिवार्यशेतकऱ्यांनी सादर केलेल्या निविष्ठा खरेदीच्या पावत्यांची खातरजमा करून विहित नमुन्यात पंचनामा करणे समितीसाठी बंधनकारक असेल. पंचनाम्याची प्रत शेतकरी आणि संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीला देणेही आवश्यक करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.