Maharashtra Government Decision On Drought Relief: राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करुन विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. आता आणखी १८ तालुक्यांत दुष्काळाची तीव्रता असून, या तालुक्यांत पिकांचे सर्व्हेक्षण, ग्राऊंड ट्रथिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने जारी केला आहे. .राज्यामध्ये जून ते सप्टेंबर २०२६ या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या ट्रिगर-१ यादीतील तालुक्यांव्यतिरिक्त १८ तालुक्यांमध्येदेखील दुष्काळाची तीव्रता आहे. सदर तालुक्यातील प्रमुख ५ पिकांच्या २० टक्के सर्व्हेक्षण, ग्राऊंड ट्रथिंग (Ground Truthing) करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. .Drought Assessment Team: दुष्काळी मदतीसाठी केंद्राचे पथक राज्यात.दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. खरीप २०२६ च्या हंगामातील परिस्थितीच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करुन विविध उपाययोजना आणि सवलती लागू केल्या आहेत. आता मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्देशानुसार १८ तालुक्यांमध्ये ग्राऊंड ट्रथिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील सर्वाधिक ४ तालुक्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. .Drought Assessment : मुदखेड, मुखेड वगळून दुष्काळाचे पंचनामे सुरू.दुष्काळी यादीतून काही तालुके सुटले होते. त्यांना आता ग्राऊंड ट्रथिंग करावयाच्या तालुक्यांच्या यादीत ठेवण्यात आले आहे. यात छत्रपती संभीजनगर विभागातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेडा, मुखेड या दोन तालुक्यांचा समावेश आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती, ब्रम्हपुरी व बल्लारपूर, गोंदिया जिल्ह्यातील आमगांव, देवरी, सालेकसा व गोंदिया तालुके समाविष्ट करण्यात आले आहेत. वर्धा जिल्ह्यातील कारंजा, भंडारा जिल्ह्यातील मोहाडी व तुमसर, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर. चांदवड व निफाड, सातारा जिल्ह्यातील पाटण, सांगली जिल्ह्यातील शिराळा व वाळवा तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. .ग्राऊंड ट्रथिंग करावयाच्या तालुक्यांची यादीनांदेड जिल्हा- मुदखेड, मुखेडचंद्रपूर जिल्हा- जिवती, ब्रम्हपुरी व बल्लारपूरगोंदिया जिल्हा- आमगांव, देवरी, सालेकसा व गोंदियावर्धा जिल्हा- कारंजाभंडारा जिल्हा- मोहाडी व तुमसरनाशिक जिल्हा- त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसातारा जिल्हा- पाटणसांगली जिल्हा- शिराळा व वाळवाएकूण तालुके- १८ .आणखी ३६ तालुक्यांत सर्व्हेक्षण- महसूलमंत्री बावनकुळे राज्यातील १८ तालुक्यांमध्ये ग्राऊंड ट्रथिंग आणि १८ तालुक्यांचा अहवाल मागवला आहे. एकूण ३६ तालुके सर्व्हेक्षणाकरिता पाठवले आहेत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (दि. ९ ऑक्टोबर) नागपुरात बोलताना दिली. २६५ तालुक्यांव्यतिरिक्त ३६ तालुक्यांचा विषय मंत्रिमंडळ उपसमितीसमोर आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनुसार या तालुक्यांत आता सर्व्हेक्षण होईल. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील दुष्काळाची दखल घेतली आहे. त्यासाठी तातडीने केंद्रातून तीन पथके महाराष्ट्रात सर्व्हेक्षणासाठी पाठवली आहेत, असेही त्यांनी सांगितले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.