Maharashtra Food Distribution Government GR: राज्यातील दुष्काळ (Trigger-१) जाहीर झालेल्या २६५ तालुक्यांतील लाभार्थ्यांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा विनाविलंब व सुरळीतपणे उपलब्ध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जारी केला आहे..राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये खरीप २०२६ हंगामासाठी Trigger-१ (प्रथम कळ) लागू करून विविध सवलती व उपाययोजना घोषित करण्यात आलेल्या आहेत. यानुसार दुष्काळग्रस्त भागातील शेतीवर आश्रित शेतकरी, शेतमजूर आदी घटकांना अन्नधान्याची टंचाई भासू नये, यासाठी प्रभावी व्यवस्था उभी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यादृष्टीने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत..Maharashtra Drought GR: आणखी १८ तालुक्यांत पिकांच्या पंचनाम्याचे आदेश.राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत केंद्र सरकारने विहित केलेल्या इष्टांकाच्या मर्यादेत गरजू लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य वितरित करण्यात येते. आता दुष्काळ जाहीर झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांत अन्नधान्याचा पुरवठा करण्याबाबत कार्यवाही निश्चित करण्यात आली आहे..Drought Assessment Team: दुष्काळी मदतीसाठी केंद्राचे पथक राज्यात.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा विनाविलंब व सुरळीतपणे उपलब्ध करण्याकरिता आवश्यक ती उपाययोजना करावी.एपीएल डीबीटी (APL DBT) योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना नियमितपणे देण्यात येईल याची दक्षता घ्यावी.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समावेश व आधार सिडिंग: सन २०२६ च्या खरीप हंगामात दुष्काळ (Trigger-१) जाहीर केलेल्या २६५ तालुक्यांमधील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या कोणत्याही व्यक्तीने, मोफत अन्नधान्याची मागणी केल्यास त्या व्यक्तीचा विहित निकषांनुसार, त्यांच्या उत्पन्नाच्या व उपलब्ध इष्टांकाच्या मर्यादेत, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंब प्रवर्गात समावेश करावा. शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे आधार सिडिंग पूर्ण करावे आणि त्यांना तत्काळ अन्नधान्य उपलब्ध करुन देण्यात यावे.एईपीडीएस (AePDS) व पॉस (PoS) पकरणांद्वारे पोर्टेबिलिटी (Portability) सुविधेचा लाभ: सद्य:स्थितीत, राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना बायोमेट्रीक ओळख पटविल्यानंतर ई- पॉस यंत्राद्वारे अन्नधान्याचे वितरण केले जात आहे. राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या नोंदी एईपीडीएस प्रणालीवर उपलब्ध असून ई-पॉस (POS) यंत्राद्वारे 'वन नेशन वन रेशन कार्ड' अंतर्गत पोर्टेबिलिटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. .स्थलांतरितांना कोणत्याही रास्तभाव दुकानातून अन्नधान्य घेता येणार दुष्काळ जाहीर झालेल्या २६५ तालुक्यांतून शेतमजूर व नागरिकांचे रोजगार किंवा पाण्यासाठी शहरी, निमशहरी अथवा नजीकच्या भागात स्थलांतर होण्याची शक्यता असते. अशा स्थलांतरित नागरिकांना त्यांच्या नेमून दिलेल्या रास्तभाव दुकानाव्यतिरिक्त इतर कोणत्याही सोयीच्या रास्तभाव दुकानातून अन्नधान्य उचल करता यावे, यासाठी पोर्टेबिलिटी सुविधेची काटेकोर अंमलबजावणी करावी. स्थलांतरामुळे एकही पात्र कुटुंब अथवा लाभार्थी हक्काच्या अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्तिगत दक्षता घ्यावी. तसेच दुष्काळग्रस्त भागातील पात्र लाभधारकांना शिधापत्रिका देण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.