Rural Crisis: दुष्काळी मदतीची पाच हजार रुपयांची अग्रिम रक्कम एक कोटी शेतकऱ्यांना मिळाली असून, १० लाख शेतकऱ्यांची रक्कम विविध कारणांमुळे रखडल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव विनिता वेद सिंगल यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली. या माहितीमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची संख्या नेमकी किती, या नव्या वादाला तोंड फुटले आहे..राज्य सरकारने २७ ऑक्टोबर रोजी दुष्काळी मदतीचा निर्णय जाहीर करताना दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांतील एकूण दीड कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रिम मदत म्हणून दिली जाईल, असे जाहीर केले होते. ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु दिवाळी उलटून गेली तरी अजून ५० लाख शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्याची माहिती पुढे आली. परंतु सिंगल यांच्या म्हणण्यानुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची संख्या दीड कोटी नसून १ कोटी १० लाख आहे, त्यामुळे मदतीपासून वंचित शेतकरी ५० लाख नव्हे तर केवळ १० लाख आहेत..सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक नोंदणी केलेली आहे, म्हणजे ज्यांच्याकडे फार्मर आयडी आहे, त्या शेतकऱ्यांची एकूण संख्या दीड कोटी असून दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांतील शेतकऱ्यांची संख्या १ कोटी १० लाख आहे. नंतर दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढली तर अडचण नको, म्हणून मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात दीड कोटी शेतकरी असा उल्लेख करण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले..Drought Mitigation : बळीराजा आणि पशुधनाला दिलासा! पाणीटंचाई व चारा नियोजनाला प्राधान्य देण्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश.दरम्यान, राज्यात दुष्काळाची दाहकता वाढत असून, एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे देण्यात येणारी वाढीव रक्कम एकाच वेळी न देता, दोन हजार रुपयांची मदत हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला (६ डिसेंबर) जाहीर होण्याची शक्यता आहे. उर्वरित रक्कम प्रतिमहिना वितरित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे..राज्य सरकारने ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यांतील एक कोटी १० लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी देण्यात येणाऱ्या रकमेपैकी पाच हजार रुपये मदत मिळणे अपेक्षित होते. यापैकी एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांत रक्कम जमा झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यांतील त्रुटींमुळे रक्कम जमा झालेली नाही. शेतकऱ्यांची माहिती जमा करण्यासाठी कर्जमाफीची रक्कम वितरित झालेली कर्जखाती, नमो शेतकरी महासन्मान निधीची खाती, शेतकरी ओळख क्रमांक, महसुली नोंदी आदींचा वापर करण्यात आला..मात्र, जे शेतकरी मृत झाले आहेत आणि ज्यांची वारस नोंद झालेली नाही, संयुक्त खाते असल्याने एकाच खातेदाराला रक्कम मिळणे, तसेच मागील वर्षभरात ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यात अडचणी आल्या आहेत. परिणामी, १० लाख शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम वितरित करण्यात अडचणी येत असल्याची माहिती सिंगल यांनी दिली..Drought Compensation: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या : राष्ट्रवादी.तालुक्यांच्या समावेशासाठी दबावराज्यात आणखी १० तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात येणार आहे. यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील तालुक्यांचा समावेश असेल. संबंधित तालुक्यांत दुष्काळ जाहीर करावा, यासाठी आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे आज (ता.१७) होणाऱ्या दुष्काळ निवारण उपसमितीच्या बैठकीत राजकीय दबावापोटी आणखी १० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे..प्रस्ताव आठवड्यातराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून (एनडीआरएफ) मिळणाऱ्या मदतीच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने पहिला १७ हजार कोटी रुपयांचा आणि दुसरा ३१ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. दुसऱ्या प्रस्तावात पीक नुकसान, पशुधनासाठी चारा, पिण्याचे पाणी, रोजगार हमीची कामे, शैक्षणिक शुल्क आदींचा समावेश करण्यात आला आहे. कृषी विभागाने पीक नुकसानीपोटी १५ हजार ३८६ कोटी १९ लाख रुपयांची मागणी करणारा प्रस्ताव दिला आहे. पशुधनाच्या चाऱ्यासाठी नऊ हजार कोटी रुपये मागण्यात आले आहेत..सॅटेलाइट इमेजरीची अडचणराज्यात अपवाद वगळता सर्वच तालुक्यांत मॉन्सूनच्या काळात ३० दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा तुटवडा होता. मात्र, या काळात एखाद्या दिवशी पाऊस पडला. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे तालुके दुष्काळ यादीतून वगळण्यात आले आहेत. तसेच नुकसान भरपाईसाठी सॅटेलाइट इमेजरी (उपग्रह छायाचित्रे) वापरली जात आहेत. यात पिके हिरवी असली, तरी त्यांना फळधारणा झालेली नाही. फळधारणा झाली असली, तरी ती पक्व झालेली नाही. उपग्रह छायाचित्रांत या बाबी दिसत नसल्याने अशा पिकांचा नुकसानभरपाईत समावेश होत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने यासंदर्भात त्रुटी काढल्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.