स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी याचदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावरपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट.Eknath Shinde Meets PM Modi: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. निधी देण्यावरुन नाराजीनाट्य सुरु असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी भाजपच्या नेत्यांनी स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे..दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेऊन दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. .Local Self-Government : स्थानिक स्वराज्य संस्थांचा परस्पर संबंध.''पंतप्रपधान मोदींना शाल, पुष्पगुच्छ आणि संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट दिली. यावेळी अनेक विषयावर सकारात्मक चर्चा झाली. एनडीएमधील सर्व घटक पक्ष हे विचाराने एकत्र आलेले पक्ष असून ही आघाडी अशीच भक्कम रहावी, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. मोदीजींनीही मला आणि माझ्या कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या,'' असे शिंदे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. .Flood Management : स्थानिक स्वराज्य संस्था आणि पूर नियंत्रणाचे उपाय.आम्हाला 'एनडीए'चा भाग असल्याचा अभिमान आहे. ते केवळ देशाचे पंतप्रधानच नाहीत तर एनडीए कुटुंबाचे प्रमुखदेखील आहेत. महायुती आणि एनडीए हे विकासाच्या अजेंड्यावर एकत्र आहेत, असेही त्यांनी नमूद केले. .''महायुतीमध्ये कोणताही बेबनाव नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक हा तळागाळातील निवडणूक आहे. कार्यकर्त्यांना वाटत असते की ही निवडणूक लढवावी. पण याबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ घेत असतात. महायुतीच्या वरिष्ठांनी निर्णय घेतला की कार्यकर्ते त्याचे पालन करत असतात. आम्ही शिस्तीने चालणारे, शिस्तीने वागणारे सगळे लोक आहोत,'' असे शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. .शिवसेना नेते रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बोलताना शिंदे म्हणाले की, धंगेकरांना माझ्याकडून निरोप गेला आहे. महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडणार नाही. याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.