Dams Water Levels: राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण सुमारे ३०२८ धरणांमध्ये सध्या ४००.८३ टीएमसी म्हणजेच २७ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच कालावधीत राज्यातील धरणांमध्ये ४३३.२९ टीएमसी (३० टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा सुमारे ३२.४५ टीएमसी म्हणजेच तीन टक्क्यांनी पाणीसाठा कमी असल्याची माहिती समोर आली आहे..‘एल निनो’चा प्रभाव, वाढते तापमान आणि पावसाची अनिश्चिततेमुळे कमी पाणीसाठा हा चिंतेचा विषय मानला जात आहे. सध्या उन्हाळी हंगाम सुरू असून, उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्यासाठी होत आहे. मात्र वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. यंदा २०२६ मध्ये पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. .Dam Water Stock: पुणे जिल्ह्यातील धरणांत १०४ टीएमसी साठा.या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागांना पिण्याच्या पाण्याचे आरक्षण सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शासन, प्रशासन आणि जलसंपदा विभागाने आवश्यक तयारी सुरू केली आहे..Ujani Dam Water Stock: ‘उजनी’ची पाणीपातळी ५० टक्क्यांकडे .दरम्यान, ग्रामीण भागातील अनेक पाणीपुरवठा योजनांचे जलस्रोत आटल्याने काही भागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे..जायकवाडीतील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा अधिकजायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा १ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत सुमारे ७.२८० टीएमसीने घटला असला, तरी तो अद्याप गतवर्षीच्या तुलनेत २.४०८ टीएमसी (३.१४ टक्के) अधिक आहे. ही बाब दिलासादायक मानली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.