Pune News : कोकण, मध्य महाराष्ट्रासह घाटमाथ्यावर आणि विदर्भात मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील अनेक धरणे ९० टक्क्यांहून अधिक भरली आहेत, २९९७ धरणांत ११६२.३६ टीएमसी म्हणजेच ८१ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणे तुडुंब भरल्याने नद्यांना विसर्ग सोडण्यात आला आहे. .गेल्या वर्षी राज्यातील धरणांत ६९ टक्के एवढा पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास १२ टक्के अधिक साठा उपलब्ध आहे. सध्या राज्यातील पावसाचा जोर गुरुवारपासून काहीसा कमी झाला आहे..कोकणात धरणे भरलीकोकणात मागील चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक धरणे ९० टक्क्यांहून अधिक भरली आहेत. अजूनही या भागात पाण्याची आवक वेगाने सुरू आहे. त्यामुळे भातसा धरणातून ७०२ क्युसेक, सूर्या (कवडास) ७१७९, वैतरणा (अप्पर) ७११९, जगबुडी नदी (कोकण) ४१९, गडनदी(कोकण) ३२५५, सातंडी नाला (कोकण) ४७२१ क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे..Ujani Dam: उजनीतून ९० हजार क्युसेक विसर्ग.म. महाराष्ट्रात विसर्गात वाढपुणे जिल्ह्यातील सहा धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे खडकवासलातून ३३९९०, टेमघर २८७७, वरसगाव १०,१०५ वडिवळे ५२५४, भाटघर १२,११४, वीर १८,५७९, डिंभे १३,८१०, घोड २० हजार, मुळशीतून ११३००, उजनीतून १,३१,६०० हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. नाशिक विभागातील दारणातून १८४३८ क्युसेक, हतनूर धरणातून ५३४९६, प्रकाशा (तापी) १,३१,१४३, गंगापूरमधून ७३७२ क्युसेक, नांदूर मधमेश्वर(गोदावरी) ४५७६६ क्युसेक, नगरमधील भंडारदरा धरण (प्रवरानदी) ८९९३, निळवंडे धरण(प्रवरा नदी) ४८४१, कोतूळमधून मुळा नदीला ९१५५ क्युसेक, मुळातून कालव्याला ६०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे..विदर्भात धरणे भरलीविदर्भात अनेक धरणांत ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. तर नागपूर विभागातील गोसी खुर्दतून (धरण) १,३४,८६८ क्युसेकने वैनगंगा नदीला, निम्न वर्धा धरणातून १७,८५३ क्युसेकने वर्धा नदीला, इटियाडोहातून १६९४ क्युसेक, शिरपूर १७४२, अमरावती विभागातील खडकपूर्णातून १२०२८ क्युसेक, पेनटाकळी २१५३, बेंबळातून ११८६४ क्युसेकने विसर्ग सोडला आहे..Warna Dam : सांगलीत वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू.मराठवाड्यात साठा वाढलामराठवाड्याच्या अनेक भागांत कमी-अधिक पाऊस झाला आहे. जूनमध्ये काही प्रमाणात पाऊस झाल्याने धरणात आवक सुरू झाली होती. परंतु जुलैमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने धरणातील आवक मंदावली होती. मात्र ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे धरणात चांगलीच आवक झाली. त्यामुळे अनेक धरणांत ८० टक्क्यांहून अधिक साठा झाला आहे. जायकवाडीत जवळपास ९५ टक्के पाणीसाठा झाला आहे..पाणी सोडण्यापूर्वी इशाराजलसंपदा विभागामार्फत महसूल, पोलिस प्रशासनाला कळवून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. त्यासाठी नदीकाठच्या गावांतील प्रशासनाला महसूलमार्फत कळवून दवंडी देण्यात येते. तसेच जलसंपदा विभागाच्या उचित यंत्रणेकडून चार चाकी वाहनाद्वारे, सोशल मीडियावर मेसेजद्वारे सतर्क करून पाणी सोडले जाते, अशी माहिती जलसंपदा विभागाचे माजी अभियंता हरिश्चंद्र चकोर यांनी दिली..इगतपुरी (जि. नाशिक) तालुक्यात पावसाचा जोर असल्याने दारणा धरणातून सर्वाधिक १४,५५६ क्युसेकने विसर्ग.उजनी धरणातून भीमा नदीत एक लाख ४० हजार क्युसेकने विसर्ग. शंभर कुटुंबांचे स्थलांतर.पंढरपूर आणि परिसरात पूरस्थिती. प्रशासन सतर्क. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू..विभागनिहाय धरणसाठा (टीएमसी)विभाग धरणांची संख्या उपलब्ध पाणीसाठा टक्केनागपूर ३८३ ११६.२४ ७१अमरावती २६४ १०५.५२ ७९छत्रपती संभाजीनगर ९२० १८८.८९ ७३नाशिक ५३७ १५३.१६ ७३पुणे ७२० ४७९.६० ८९कोकण १७३ ११८.९३ ९१एकूण २९९७ ११६२.३६ ८१.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.