Water Crisis: राज्यातील सर्व विभागांतील सुमारे तीन हजारांहून अधिक धरणांमध्ये सध्या केवळ सुमारे ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये सर्वाधिक पाणीसाठा म्हणजे ४४.३९ टक्के अमरावती विभागात असून, सर्वांत कमी पाणीसाठा म्हणजे २५.२६ टक्के पुणे विभागात आहे. मागील वर्षीपेक्षा पाणीसाठा समाधानकारक असला, तरी पाणी जपून वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे..राज्यातील नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण विभाग मिळून एकूण तीन हजार २८ मोठे, मध्यम व लघू प्रकल्प आहेत..Water Levels Drop: उन्हामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट.त्यातही सर्वांत जास्त प्रकल्प छत्रपती संभाजीनगर विभागात असून, त्यांची संख्या ९२९ आहे. सर्वांत कमी प्रकल्प कोकण विभागात असून, त्यांची संख्या १७३ एवढी आहे..Sindhudurg Water Storage: सिंधुदुर्गातील लघुप्रकल्पांमध्ये केवळ २६.९४ टक्के पाणीसाठा शिल्लक.उन्हाळ्यामुळे मार्च महिन्यापासूनच धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. तसेच, सिंचन आणि पिण्यासाठीही पाण्याचा वापर वाढल्याने उपसाही वाढला आहे. परिणामी, धरणांमधील पाण्याची पातळी सरासरीपेक्षा खूपच खालावली आहे. पाण्याचा वापर जपून करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने केल्या आहेत..पाणीसाठा (टक्क्यांत)विभाग १९ मे पर्यंतचा साठा मागील वर्षीचानागपूर ४२.६६ ३३.०४अमरावती ४४.३९ ३९.३८संभाजीनगर ३८.३८ २८नाशिक ३४.६० ३१.३६पुणे २५.२६ २२.२९कोकण ३७.७६ ३८.२५एकूण ३३.९५ २८.९६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.