Sangli News : राज्यातील सत्ताधारी पक्षातील म्होरक्या संचालकांना पुढे करून जिल्हा बँकेत नोकर भरतीतून लूट करण्याचा घाट घालण्यात आला होता. तो डाव आम्ही उधळला आहे. बँकेतील ५०७ जागांवरील भरतीसाठी सध्या सुरू असलेल्या प्रक्रियेला सहकार विभागाने स्थगिती दिली आहे..आयबीपीएस किंवा टीसीएस या संस्थेद्वारे भरती प्रक्रिया राबवावी, असे आदेश सहकार विभागाच्या अवर सचिव मंजूषा साळवी यांनी दिले आहेत, अशी माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी गुरुवार (ता.९) पत्रकार परिषदेत दिली..Sangli DCC Bank : सांगली बॅँकेच्या चौकशीवरील स्थगिती उठवली.भाजप किसान सभेचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, शेतकरी भारत पक्षाचे सुनील फराटे उपस्थित होते. श्री. खोत म्हणाले, ‘‘राज्याचे सहकार आयुक्त खूप कामसू आहेत. त्यांना देशाच्या सहकार सचिवपदी नेमायला हवे. जिल्हा बँकेतील जुन्या नोकर भरती प्रक्रियेची चौकशी सुरू असताना, त्यात अनियमितता आढळली असताना त्यांनी नव्या भरतीला मान्यता दिली आहे. .सहकार मंत्र्यांच्या संमतीशिवाय हे झाले नाही. वाड्यातील मंडळी गावगाड्यातील पोरांना लुटायला बसली आहेत. अधिकारी, नेते, मंत्री साऱ्यांच्या वाटण्या ठरल्या आहेत. या प्रकरणी मी आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी हे प्रकरण अत्यंत गांभिर्याने घेतले. .Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बॅंकेने कृषीसाठी नावीन्यपूर्ण योजना राबवावी.त्यांच्या आदेशानेच भरतीच्या चालू प्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे. राज्यातील एकूणच सहकारी संस्था भरतीसाठी एक मार्गदर्शक धोरण ठरवले जाणार असल्याचेही सांगितले आहे.’’ ते म्हणाले, ‘‘याआधी झालेली भरती प्रक्रिया सदोष आहे. त्याच्या चौकशीत ४४ दोष सापडले होते. चौकशी समिती बदलून ते कमी करत चारवर आणले आहेत. .आम्ही पुन्हा ४४ मुद्यांची नव्याने चौकशी करून संचालकांवर दोषारोप निश्चिती आणि त्यांच्या मालमत्तांवर बोजा चढवण्याबाबत आग्रही आहोत. जिल्हा बँकेत सर्वपक्षीय कारभारी आहेत. ज्याची राज्यात सत्ता येते, त्या पक्षाच्या संचालकांना पुढे करून बाकीचे मागे फेर धरतात. गेले काही दिवस मंत्रालयाबाहेर प्रदक्षिणा सुरु आहेत, मात्र फडणवीस यांनी कुणालाही भेट दिली नाही. या स्थगितीच्या विरोधात काही मंडळी न्यायालयात जाण्याची भाषा करत आहेत, त्यांनी जावेच.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.