Maharashtra Civic Body Elections Voting: मुंबई (BMC elections) सह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी आज गुरुवारी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. यासाठी सकाळी ७.३० वाजता मतदानाला (Voting time) सुरुवात झाली. संध्याकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ आहे. तर या निवडणुकांचा निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होईल. .राज्यातील २९ महानगरपालिकांमधील एकूण जागांची संख्या २,८६९ आहे. तर एकूण प्रभाग संख्या ८९३ एवढी आहे. त्यात महिलांसाठी १,४४२ जागा आरक्षित आहेत. या महानगरपालिका क्षेत्रामध्ये ३ कोटी ४८ लाख ७८ हजार १७ मतदार असून ते १५,९३१ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. यात मुंबईतील १,७०० आणि पुणे येथील १,१६६ उमेदवारांचा समावेश आहे. मतदारांना मतदानासाठी जाताना निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र दाखवता येईल..'या' महानगरपालिकांसाठी मतदान बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मिरा-भाईंदर, वसई-विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली-मिरज-कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर..Zilla Parishad Election: मिनी मंत्रालयासाठी बिगुल.मुंबईतील प्रत्येत प्रभागातील मतदारांना केवळ एकच मत द्यावे लागेल. मुंबई वगळता राज्यातील इतर २८ महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग आहेत. काही प्रभाग ४ सदस्यीय आहेत. तर काही प्रभाग ३ अथवा ५ सदस्यीय आहेत. त्यामुळे मतदारांना तितक्या संख्येनुसार मते द्यावी लागणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे. .Muncipal Election: अखेरच्या टप्प्यात जोरदार चुरस.मुंबईत ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाईशिवसेनेत २०२२ मध्ये फूट पडली. शिवसेनेतील फुटीनंतरची त्यांची पहिलीच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईवर शिवसेनेची २५ वर्षांपासून सत्ता राहिली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने तब्बल दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले आहेत. या निवडणुकीत, विरोधी पक्ष काँग्रेस मुंबईत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन लढत आहे. तर दुसरीकडे मुंबईत भाजप आणि शिंदे सेनेची युती झाली आहे..पुण्यात अजित पवारांची प्रतिष्ठा पणालापुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याचे चित्र दिसून येते. येथे अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपच्या विरोधात लढा देत आहे. येथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. यामुळे मतदार कुणाला कौल दोणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.