Mumbai News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ मोठे आकडे व पोकळ घोषणा दिल्या असल्याची टीका विरोधी पक्षांतील नेत्यांनी केली आहे. सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवलेला असून, ४० हजार कोटी रुपयांच्या तुटीचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे घेऊन जाणारा आहे..हा अर्थसंकल्प शहरी महाराष्ट्रासाठी आहे, तसेचबळीराजा आणि सामान्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही विरोधकांनी म्हटले आहे..Maharashtra Agri Budget: अर्थसंकल्पात कृषी यांत्रिकीकरणाला बगल.सरकारने राज्यावर कर्जाचा डोंगर करून ठेवलेला असून ४० हजार कोटी रुपयांच्या तुटीचा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिवाळखोरीकडेघेऊन जाणारा आहे. अर्थसंकल्पात बुलेट ट्रेन, मेट्रो, भुयारी मार्गांचाच बोलबाला आहे. गाव खेड्यातला गरीब, आदिवासी, कष्टकरी, महिला, बेरोजगार व तरुणांना अर्थसंकल्पात स्थानच नाही. एकंदरीत हा अर्थसंकल्प मोजकी शहरे आणि मोजक्या लोकांसाठीच आहे. सर्वसामान्यांना यातून काहीही मिळणार नाही.हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.Maharashtra Budget 2026: अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी.पंतप्रधान पीकविमा योजनेच्या प्रीमियमसाठी राज्य सरकारने मागील वर्षी २५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम खासगी कंपन्यांना दिली. आर्थिक पाहणी अहवालात एकाही शेतकऱ्याला एक रुपयाही मिळाला नाही, असे दिसते. अर्थसंकल्पात यावर चकार शब्द नाही. ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केले होते, पैकी फक्त ९ हजार कोटी शेतकऱ्यांना पोहोचले, उर्वरित मदतीबद्दल एक आवाक्षर मुख्यमंत्र्यांनी काढले नाही. भावांतर योजना घोषित करताना मुख्यमंत्री म्हणाले क्रांतिकारी निर्णय, त्या भावांतर योजनेचे पुढे काय झाले हे कळायला मार्ग नाही. कर्जमाफीचे किचकट नियम आणि अटी बघता शेतकऱ्यांना दिलासा देण्याची सरकारची प्रामाणिक इच्छा आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.हनुमंत पवार, प्रवक्ते, काँग्रेस.आर्थिक पाहणी अहवाल कृषी क्षेत्राच्या दुरवस्थेवर शिक्कामोर्तब करतो आहे. शेती रसातळाला गेली असताना सरकार फक्त घोषणांचा पाऊस पाडते आहे. राज्याची आर्थिक स्थिती आणि प्रलंबित अनुदाने पाहता, जाहीर केलेली कर्जमाफी ही वस्तुस्थितीपेक्षा ‘मृगजळ’ ठरण्याचीच भीती अधिक आहे. मेट्रो आणि विमानतळांसाठी भरघोस तरतूद केली आहे. मात्र बळीराजाच्या झोळीत काहीच नाही. हे बजेट ‘शहरी महाराष्ट्रा’साठीच बनवले आहे, असे वाटते.अंबादास दानवे, आमदार, शिवसेना (उबाठा गट).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.