Bovine Breeding Act: ‘बोव्हाइन ब्रीडिंग’ची प्रभावी अंमलबजावणी करा: पशुसंवर्धन आयुक्त पाटील
Animal Husbandry Commissioner Orders: राज्यातील गाई-म्हशींच्या जाती सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम, २०२३’ लागू केला आहे. मात्र अनेक खासगी कृत्रिम रेतन सेवा व संस्थांनी अद्याप नोंदणी न केल्याने संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाने दिले आहेत.