Maharashtra Politics: राज्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या हा गंभीर आणि चिंतेचा विषय असून, त्यासंदर्भातील स्थगन प्रस्ताव स्वीकारून त्यावर चर्चा करावी, या विरोधकांच्या मागणीला अध्यक्षांनी नकार दिल्याने गुरुवारी (ता. २) विधानसभेत विरोधकांनी सभात्याग केला..काँग्रेसचे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी लातूर जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांचा मुद्दा स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केला. या विषयावर तातडीने चर्चा घ्यावी, अशी त्यांनी मागणी केली. मात्र अध्यक्षांनी ही मागणी फेटाळल्याने विरोधकांनी सभात्याग केला..Farmer Crisis: कर्जमाफी होणार नसल्याच्या भीतीनेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नाना पटोलेंचा विधानसभेत गंभीर आरोप.प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर पटोले यांनी शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा उपस्थित केला. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात सावकारांच्या जाचाला कंटाळून दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले. सभागृहाचे कामकाज सुरू असताना अशा घटना घडणे अत्यंत गंभीर असल्याचे नमूद करत, गेल्या सात दिवसांत सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा त्यांनी केला..Farmer Demands: कर्जमाफीच्या आदेशाची जळगाव जामोदमध्ये होळी.लातूर हा सहकारमंत्र्यांचा जिल्हा असून, तेथे सावकारीच्या जाचाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत असतील, तर ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे पटोले म्हणाले. निलंगा तालुक्यातील सोनखेड येथील मारोती मनोहर साळुंखे आणि जामगा येथील पंडित रामा पवार या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख त्यांनी केला. .वडेट्टीवार यांनीही या मुद्द्यावर आग्रही भूमिका घेतली. पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच लातूरमध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगत सरकारने याबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र अध्यक्षांनी ही मागणीही फेटाळल्याने विरोधकांनी सभात्याग केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.