Rural Development: राज्य शासनाने आदर्शगाव योजनेच्या सुधारित मापदंडांना अखेर मंजुरी दिली आहे. डोंगराळ व आदिवासी भागांसाठी प्रति हेक्टर २८ हजार आणि इतर गावांसाठी २२ हजार रुपये असा नवीन निधी निश्चित करण्यात आला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील जलसंधारण आणि विकास उपक्रमांना चालना मिळणार आहे.