Farmer Support: राज्य सरकारने मंगळवारी (ता. ४) वर्धा, सोलापूर, पुणे आणि सांगली जिल्ह्यांसाठी एकूण १०५६ कोटी रुपयांचे रब्बी अनुदान मंजूर केले आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा दिलासा मिळणार आहे.