Tourism Policy: धरण क्षेत्रांतील पर्यटनाच्या जागांचा होणार ‘बाजार’
Water Resources Dept: राज्यातील धरणक्षेत्रे आणि पर्यटनस्थळांच्या विकासासाठी जलसंपदा विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. आता या ठिकाणी असलेल्या इमारती, विश्रामगृहे आणि जमिनी ‘पीपीपी’ तत्त्वावर ४९ वर्षांसाठी खासगी संस्थांना दिल्या जाणार आहेत. यासोबतच या ठिकाणांवरील दारूविक्रीवरील बंदीही हटवण्यात आली आहे, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे.