FPC Scam: ‘‘ नंदुरबारच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने (एसएओ) शेतकऱ्यांच्या नावाखाली आधी तब्बल ९.९३ कोटीच्या रकमा बोगस शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) वाटल्या होत्या. हा गैरव्यवहार पचल्याचे पाहून लगेचच ९.७८ कोटींवरदेखील डल्ला मारण्यात आला. रकमा वाटताना एसएओ कार्यालयाने ‘४० टक्के आमचे आणि ६० टक्के तुमचे’ अशी एकमेव अट लादली होती,’’ अशी धक्कादायक माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ‘ॲग्रोवन’ला दिली. .या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या घोटाळ्याचे धागेदोरे कृषी विभागाच्या चौकशी अहवालात सापडतात. अहवालात चेतनकुमार ठाकरे यांचे नाव नमूद करण्यात आले आहे. ते आधी केवळ उपविभागीय कृषी अधिकारी होते. अनुदानावर डल्ला मारण्यासाठी आधी पद्धतशीरपणे नंदुरबारचे ‘एसएओ’पद रिक्त ठेवले गेले. ते पद ठाकरे यांनी शिताफीने मिळवले. त्यांना पद मिळवण्यासाठी कृषी आयुक्तालयातील एक महाभाग आणि विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील एका अधिकाऱ्याने मदत केली..Agriculture FPO Scam: ‘एफपीसीं’च्या नावाने १९ कोटी हडप.एसएओ होताच ठाकरे यांनी जिल्ह्यात हुकूमशाही सुरु केली. ते उपविभागीय कृषी अधिकारी, उपसंचालक किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांना न विचारताच निर्णय घेऊ लागले. एफपीसींना अनुदान वाटणारी योजना ठाकरेंनी एकाही अधिकाऱ्याला न विचारता एकट्याने रेटून नेली. ठाकरेंनी सर्व कागदपत्रे हाताळण्याची जबाबदारी कृषी अधिकारी विजय मोहिते यांच्यावर सोपवली. .त्यानंतर बोगस एफपीसींच्या याद्या तयार झाल्या. भराभर प्रस्ताव मंजूर झाले आणि अनुदानाचा पहिला हप्तादेखील वाटला गेला. पहिले हप्तावाटप बिनबोभाटपणे झाल्याने दुसरा हप्ताही विनासायास वाटला गेला. ही सर्व कामे केवळ ठाकरे व मोहिते यांच्या स्वाक्षरीने करण्यात आली आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे..जोडीने वाटले अनुदानविभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले, की या जोडगोळीने कृषी आयुक्त, कृषी सचिव, कृषी संचालक यांना अनुदानवाटपाबाबत कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही. उलट, बिनबोभाट १९ कोटी ७१ लाख रुपये अनुदान वाटले. अनुदानाची खिरापत वाटली जात असताना नंदुरबारचे जिल्हाधिकारी कार्यालय आणि सहसंचालक कार्यालयाचे दुर्लक्ष होईल, याची काळजी ठाकरे व मोहिते यांनी घेतली. गैरव्यवहाराचा अहवाल जिल्हाधिकारी व कृषी आयुक्तालयाला सादर केल्यानंतर तात्काळ दोघांना निलंबित करणे, तसेच फौजदारी गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. मात्र, या गैरव्यवहाराकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने अनुदानाचे लाभार्थी आयुक्तालय आणि मंत्रालयात बसले आहेत का, अशी शंका आम्हाला येते आहे..FPC Scam: शेतकरी नसलेल्या ‘एफपीसीं’ना कोट्यवधी रुपयांची खिरापत.निकष, अटी काहीही नाहीतचौकशी अहवालात ठाकरे व मोहिते यांच्या अनागोंदीच्या अनेक सुरस कथा देण्यात आल्या आहेत. ‘‘ एफपीसींना अनुदान वाटण्यासाठी लाभार्थ्यांची पात्रता निश्चित करावी लागते. उदाहरणार्थ, एफपीसींमध्ये किती भागधारक असावेत, भागभांडवल किती हवे, संचालक मंडळ कसे असावे, उलाढाल किती असावी याचे कोणतेही निकष तयार केले गेले नाहीत. .कोट्यवधी रुपयांचे अनुदान वाटण्यापूर्वी संबंधित एफपीसींकडून येणाऱ्या अर्जांची साधी नोंदवहीदेखील ठेवली नाही. कोणती एफपीसी खरी, कोणती खोटी, यापूर्वी कोणत्या एफपीसीने सरकारी अनुदान घेतले आहे, एफपीसीची पत किती, त्यांनी कर्ज काढले आहे का, अशी कोणतीही तपासणी केली नाही. अर्जाची साधी पडताळणी न करता धडाधड कोट्यवधी रुपयांच्या रकमा एफपीसींच्या खात्यात जमा केल्या. त्यात सात एफपीसींमध्ये एकही शेतकरी सभासद नव्हता. सहा एफपीसींमध्ये एकाच कुटुंबातील सदस्य संचालक होते,” असे ताशेरे चौकशी अहवालात मारण्यात आले आहेत. .ठाकरे, मोहितेंचे ठरलेले सूत्र ‘‘१९ कोटींची खिरापत वाटताना सरकारी निकषांऐवजी एसएओ कार्यालयाने ठाकरे व मोहिते यांचे निकष वापरले. या खिरापतीचे नेमके वाटेकरी शोधण्यासाठी आधी फौजदारी गुन्हा दाखल करावा, त्यानंतर या दोघांचे, तसेच जिल्हा नियोजन समिती अधिकाऱ्याच्या भ्रमणध्वनीचे संभाषण अहवाल (कॉल डिटेल रेकॉर्ड ः सीडीआर) तपासले जावेत.कारण या प्रकरणामुळे जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकारी नाहक बदनाम झाले आहेत,’’ असे नंदुरबारमधील एका तालुका कृषी अधिकाऱ्याने सांगितले..अध्यक्ष, सचिवांच्या स्वाक्षऱ्याच नाहीतएफपीसींना कोट्यवधी रुपये वाटण्यासाठी एसएओ कार्यालयातील कागदपत्रांवर केवळ ठाकरे व मोहिते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र, ज्या एफपीसींच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाले त्या एफपीसींच्या अध्यक्ष व सचिवांच्या स्वाक्षऱ्या मूळ प्रस्तावात नाहीत, अशी नोंद चौकशी अहवालात करण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.