Solapur News : अतिवृष्टीग्रस्त द्राक्षबागांसाठी विशेष पॅकेज देण्यासह द्राक्षबागायतदार संघाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी (ता. १०) येथे बोलताना दिली..महाराष्ट्र राज्य द्राक्षबागायतदार संघाच्या सोलापुरात आयोजिलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. द्राक्षावरील फळ छाटणी हा चर्चासत्राचा विषय होता. प्रास्ताविकात द्राक्षबागायतदार संघाचे विभाग अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांनी विविध मागण्या मांडल्या. सोलापूरसह धाराशिव, लातूर जिल्ह्यात झालेल्या द्राक्षबागांच्या नुकसानीकडे कृषिमंत्री भरणे यांचे लक्ष वेधत भरीव मदत दिल्याबद्दल सरकारचे अभिनंदन केले..Grapes Farm: पावसानंतर द्राक्षाच्या बागेमध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता.सीनाकाठासह अनेक ठिकाणच्या बागा पाण्याखाली गेल्या, अद्यापही त्यात पाणी आहे. त्यामुळे ३५ टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याने नियमित मदतीसह विशेष पॅकेज देण्याची मागणी केली. तो धागा पकडून कृषिमंत्री भरणे बोलत होते.कृषिमंत्री भरणे म्हणाले, दर चार - पाच वर्षांत द्राक्षबागायतदारांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी परवडत नसल्याने न खचता त्यावर मात करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. दरवर्षी १५ ऑगस्टनंतर छाटणीला सुरवात होते. .सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात छाटणी केली जाते. मात्र, यंदा अतिवृष्टीमुळे ऑक्टोबरमध्ये छाटणी करण्याची पाळी आली आहे. देशाला लाभ मिळवून देणारा द्राक्षबागायतदार शेतात राबतो. तो नेहमीच अवेळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट व दुष्काळ या संकटांतही नवीन वाणाची लागवड, नावीन्यपूर्ण प्रयोगाच्या माध्यमातून उत्पादन घेऊन बाजार व्यवस्थापन करीत मालाची विक्री करतो. त्याच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील. चांगल्या योजनांच्या माध्यमातून त्याला बळ देण्यात येईल, अशी ग्वाहीही राज्याचे कृषिमंत्री भरणे यांनी दिली..Grape Farming: कडवंचीचे द्राक्ष आगार ‘जर-तर’च्या फेऱ्यात.खजिनदार शिवाजीराव पवार यांनी द्राक्ष संघाला प्रात्यक्षिक प्लॉटसाठी जागा मिळावी, अशी मागणी केली. यावेळी आयोजित तांत्रिक क्षेत्रात डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. बी. एस.यादव यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी संघाचे राज्य अध्यक्ष कैलास भोसले, उपाध्यक्ष मारुती चव्हाण, खजिनदार शिवाजी पवार, सोलापूर विभाग अध्यक्ष राजेंद्र देशमुख, सचिव शंकर येणेगुरे, अभिषेक कांचन यांच्यासह संघाचे पदाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, उमेश पाटील, संतोष पवार, आनंद चंदनशिवे, संघाचे व्यवस्थापक दिलीप माने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार सचिव शंकर येणेगुरे यांनी मानले..द्राक्षबागायतदार संघाच्या मागण्याविशेष पॅकेज द्याठिबक सिंचनासाठी १० अश्वशक्तीच्या पंपालाही वीजबिल माफी द्याकापडाच्या क्रॉप कव्हरचाही अनुदान योजनेत समावेश कराक्रॉप कव्हर योजनेतील क्षेत्राची मर्यादा वाढवाराज्यासह अन्य राज्यात द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करानागाव (जि. सांगली) येथे उपलब्ध ३० एकर क्षेत्रावर ट्रायल ब्लॉक स्थापन कारसोलापुरातही उपलब्ध ३० एकरावर ट्रायल ब्लॉक सुरू करासंघाच्या निविष्ठा आउटलेट्सना यंत्रणांकडून दिला जाणारा त्रास रोखापीकविमा ट्रिगर बदलाबेदाण्याच्या पोषण आहारात समावेशाची अंमलबजावणी करा३० क्षमतेच्या शीतगृहासाठी ५० टक्के अनुदान द्याअफगाणिस्तानातील बेदाणा आयातीवर कर लावाटु फोर डी या तणनाशकावर बंदी घालाकर्जासाठी सिबिलची अट रद्द कराव्यापाऱ्यांपासून फसवणूक रोखण्यासाठी कायदा करा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.