Pune News: राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृषी आयुक्तालयाने विशेष कृतिदलाची स्थापना केली आहे. राज्यभर बैठका घेतल्यानंतर कृतिगटाकडून एक कृती आराखडा शासनाला सादर केला जाईल, अशी माहिती आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली. .कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी स्थापन केलेल्या या कृतिदलाचे अध्यक्षपद विस्तार व प्रशिक्षण विभागाचे कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांच्याकडे असेल. कृषी संचालक सुनील बोरकर (आत्मा), स्मार्टचे अतिरिक्त संचालक उदय देशमुख, अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे,.Agriculture Department: कृषी अधिकाऱ्यांची विविध पदे दीर्घकाळापासून आहेत रिक्त.वनामतीचे अपर संचालक जीवन बुंदे, कृषी उपसंचालक नंदकिशोर नाईनवाड (प्रक्रिया), उपसंचालक सत्यजीत शितोळे (आयुक्त कक्ष) यांचा कृतिदलात सदस्य म्हणून समावेश आहे. विस्तार विभागाच्या तंत्र अधिकारी सोनाली शिळकर यांच्याकडे कृतिदलाचे सदस्य सचिवपद देण्यात आले आहे..शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्यात सध्या कार्यरत असलेल्या सामाजिक संस्था व तज्ज्ञांदेखील या कृतिदलात समावेश असावा, अशी सूचना आयुक्तांनी केली होती. त्यानुसार शेतकरी मानसिक आरोग्य व कृषी समाजशास्त्रातील तज्ज्ञ डॉ. विनायक हेगाणा, महिला शेतकरी मानसिक आरोग्य क्षेत्रातील संशोधक मानसोपचार तज्ज्ञ सृष्टी डोईजड यांना कृतिदलात निमंत्रित सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे..Agriculture Department Funds: निधीसाठी केंद्राला साकडे.शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी सोडलेली राज्यातील सर्वांत मोठी यंत्रणा कृषी विभागाची आहेत. त्यासाठी क्षेत्रिय पातळीवर दहा हजार कृषी अधिकारी कार्यरत आहेत. परंतु, वातावरण बदल, नैसर्गिक आपत्ती तसेच इतर विविध कारणांमुळे शेतकऱ्यांसमोर सतत अडचणी येतात. अशा वेळी शेतकऱ्यांना मानसिक ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शनाची गरज होती. त्यासाठीच कृतिदलाची स्थापना करण्यात आहे, असे कृषी आयुक्तालयाने म्हटले आहे..कृतिदलावर असतील अशा जबाबदाऱ्या ...शेतकरी आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या आर्थिक, सामाजिक, मानसिक कारणांचा अभ्यास करणेवातावरण बदलाचा शेतकरीवरील परिणाम अभ्यासणेशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाय सुचविणे.विविध कृषी योजना, उपक्रमांचे एकत्रीकरण केलेले प्रारूप सुचविणे.आपत्तिपूर्व व आपत्तीनंतरच्या उपायांसाठी विशेष कृती कार्यक्रम तयार करणे.विभागीय व जिल्हा स्तरावरील अंमलबजावणीचा कृती आराखडा तयार करणे.विविध शासकीय, निमशासकीय, स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधून नियोजन करणे..शेतकरी आत्महत्या हा केवळ आत्महत्येनंतर नुकसान भरपाई देण्याचा विषय नाही. शेतकऱ्याला सक्षम करण्याची गरज आहे. त्यासाठी विविध योजना, उपक्रमांचा समन्वय, उत्पादन वाढीसोबतच उत्पन्न वाढ अत्यावश्यक आहे. त्यासाठी कृतिदल दिशादायक ठरेल.सूरज मांढरे, कृषी आयुक्त.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अनेक समित्यांनी उपाय सुचवले आहेत. त्याचा अभ्यास व कालानुरूप उपाययोजना करण्यासाठी कृतिदल उपयुक्त ठरेल.रफिक नाईकवाडी, कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण विभाग.राज्यातील अडीच हजार शेतकऱ्यांना आम्ही ‘शिवार संसद’ तसेच ‘शिवार हेल्पलाइन’द्वारे आत्महत्येपासून परावृत्त केले आहे. आता या क्षेत्रात प्रभावी काम करण्यासाठी कृतिदलाच्या माध्यमातून विविध उपाय सूचविले जातील.डॉ. विनायक हेगाणा, सदस्य, कृतिदल.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.