Maha Revenue : निफाड महसूल विभागातर्फे पिंपळगाव बसवंत येथे आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरातून विविध शासकीय योजनांचा लाभ एकूण ५,४५१ लाभार्थ्यांना देण्यात आला..आमदार दिलीप बनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिबिराचे उद्घाटन करताना त्यांनी शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ''महाराजस्व'' अभियान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. .Chandwad Revenue Campaign : चांदवडच्या महसूल अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद.नागरिकांना शासकीय दाखले, प्रमाणपत्रे आणि विविध योजनांचा लाभ सुलभ, पारदर्शक व वेळेत मिळावा तसेच कार्यालयांचे वारंवार फेरे मारावे लागू नयेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले..ZP Meeting 2026: छत्रपती संभाजीनगर ‘झेडपी’ सभेत ‘कृषी’कडे दुर्लक्ष.शिबिरात तहसील कार्यालयामार्फत ९६७, पंचायत समितीमार्फत ८७५, भूमी अभिलेख विभागामार्फत ५६, तालुका कृषी कार्यालयामार्फत ४१०, तीन नगर परिषद व नगरपंचायतींमार्फत १,०२५, महिला व बालविकास विभागामार्फत ६३०, एसटी महामंडळामार्फत ४२०, बँकांमार्फत ५०, सहायक निबंधक कार्यालयामार्फत ५०, दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत १५, टपाल विभागामार्फत २५ आणि कामगार विभागामार्फत २४० लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला..यावेळी आमदार गोकुळ गिते, भास्कर बनकर, उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजित कोशीरे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, पुष्पा गाडे, बस आगार व्यवस्थापक मनोज गोसावी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.