Beed News: बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे १३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत ‘महापशुधन एक्स्पो’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या तयारीचा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकताच आढावा घेतला. .या वेळी पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह राज्यातील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते..Maha Pashudhan Expo 2023 : माळसोन्नातील लाल कंधारी वासराला प्रथम पारितोषिक.पशुसंवर्धन मंत्री मुंडे म्हणाल्या, की राज्यातील शेतकरी व पशुपालकांना नवनवीन पशुधनाची, त्यांच्या निगराणीविषयक तसेच या क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी महापशुधन एक्स्पो महत्त्वाचे ठरणार आहे. हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी पशुसंवर्धन व जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने कामे करावीत. या प्रदर्शनात जैविक शेती, पशुधनापासून होणारे लाभाविषयी शेतकऱ्यांना माहिती मिळण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करावी. महिलांसाठी वेगळा कक्ष व आवश्यक सुविधा व सुरक्षितता उपलब्ध करावी. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या पशूंच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. त्याशिवाय वैद्यकीय सुविधा कक्ष, रुग्णावाहिका, अग्निशमन यंत्रणा, पोलिस संरक्षण, स्वयंसेवक यांचीही नियुक्त करण्यात यावी, असे निर्देश मंत्री मुंडे यांनी या वेळी दिले..पशुप्रदर्शनात विविध जातींच्या १५०० पशू सहभागी होणार आहेत. त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था, डॉग शोसह विविध प्राण्यांसाठी ४० प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांचे योग्य मूल्यांकन करण्यात येऊन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्याशिवाय राज्य शासनाच्या कृषी, महिला व बालविकास यासह विविध विभागांचे माहितीपर स्टॉल असणार आहेत. तसेच बचतगटांचे स्टॉलही या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत..Maha Pashudhan Expo 2025: परळीत १०-१२ डिसेंबरदरम्यान भरणार महापशुधन एक्स्पो २०२५ ; ५.८४ कोटींचा शासन निर्णय जाहीर.राज्यातील पशूंशिवाय परराज्यातील गुणवंत व दर्जेदार पशुपक्षी यांचेही प्रदर्शन होईल. प्रदर्शनाच्या ठिकाणी रक्तदान शिबिर, अवयवदान संमती पत्र आदी सामाजिक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. या प्रदर्शनास राज्यातील शेतकरी, पशुपालक, पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यार्थी यांनीही उपस्थित राहावे, असे आवाहन मंत्री मुंडे यांनी केले..पशुसंवर्धन आयुक्त देवरे यांनी प्रदर्शनाच्या तयारीची माहिती दिली. मुख्य सभास्थानी वीस हजार आसनक्षमता असणार आहे. तीन वेगवेगळ्या पेंडॉलमध्ये सुमारे ३०० स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रदर्शनात पशुपालकांसमवेतच या क्षेत्रातील उद्योजकही सहभागी होणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. जिल्हाधिकारी जॉन्सन यांनीही प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली..राज्यातील शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू तसेच सशक्त पशुधन हा उद्देश ठेवून ‘महापशुधन एक्स्पो’ प्रदर्शनाच्या आयोजनाची तयारी करा.- पंकजा मुंडे, पशुसंवर्धन मंत्री.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.