Parli Livestock Exhibition: परळी येथील महापशुधन एक्स्पोचा रविवारी (ता.१५) समारोप झाला. या प्रसंगी प्रदर्शनात सहभागी झालेल्या विविध गटांच्या स्पर्धांमधील ८२ पशुपालक विजेत्यांना मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते तब्बल एक कोटी ७० लाख रुपयांची पारितोषिके वितरित करण्यात आली.