Nagpur News: कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर पूर्व विदर्भातील तब्बल २ लाख १९ हजार २३२ शेतकऱ्यांची लॉटरीत निवड झाली; मात्र प्रत्यक्ष लाभ केवळ २४ हजार १०१ शेतकऱ्यांपर्यंतच पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे महाडीबीटीच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे. .राज्यातील कृषी योजनांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली असून लॉटरीद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाते. निवड झाल्यानंतर पुढील टप्प्यात आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र निवड झालेल्यांपैकी केवळ ६० हजार शेतकऱ्यांनीच कागदपत्रे अपलोड केल्याची नोंद आहे..या अर्जांपैकी ४१ हजार ५९२ प्रकरणांना ‘पूर्व संमती’ देण्यात आली असली तरी प्रत्यक्ष निधी वितरणात मोठी दिरंगाई होत आहे. आतापर्यंत अवघ्या २४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यातच लाभ जमा झाला आहे..MahaDBT Portal : पीक प्रात्यक्षिकांसाठी होणार ऑफलाइन निवड.उर्वरित हजारो शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेतच अडकले आहेत. कृषी विभागाकडून टप्प्याटप्प्याने लाभ वितरण सुरू असल्याचा दावा करण्यात येत असून अपूर्ण कागदपत्रांबाबत शेतकऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र लॉटरीत निवड झालेल्यांपैकी केवळ सुमारे ११ टक्के शेतकऱ्यांनाच प्रत्यक्ष लाभ मिळणे ही बाब महाडीबीटी प्रणालीतील अडथळ्यांचे वास्तव उघड करणारी ठरत आहे. प्रत्यक्ष लाभार्थ्यांची संख्या अत्यल्प राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे..MahaDBT Portal Issue: अकार्यक्षम ‘महाडीबीटी’ पोर्टलमुळे शेतकरी त्रस्त.निवड आणि लाभात मोठी दरी का?कागदपत्रांतील त्रुटीआधार-बँक खाते लिंकिंग अपूर्णतपासणी प्रक्रियेतील विलंबपोर्टलवरील अर्ज स्थिती अद्ययावत न होणेअंतिम निधी वितरणासाठी प्रतीक्षा.अनेक शेतकऱ्यांनी लाभासाठी ऑनलाइन अर्ज केले. मात्र निवडीनंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नाही. अशी अनेक प्रकरणे आहेत. ज्यांनी कागदपत्रे सादर केली त्यांना लाभ मिळाला असून काही प्रकरणे अद्याप प्रक्रियावस्थेत आहेत.मिलिंद शेंडे - विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.