Solapur News : कृषी विभागाकडील विविध योजनांसाठी सोडतीद्वारे लाभार्थी निवडून दीड महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थ्यांना अद्याप महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करता आले नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने लाभार्थी लाभापासून वंचित राहिले आहेत. .राज्य सरकारच्या कृषी विभागाकडील कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, शेततळे अस्तरीकरण, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना, मागेल त्याला शेततळे या विविध योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागवण्यात आले होते. २०२२ - २३ या आर्थिक वर्षात अर्ज केलेल्या जिल्ह्यातील सुमारे साडेसात हजार शेतकऱ्यांची सोडतीद्वारे निवड करण्यात आली. .MahaDBT : महा़डीबीटीकडून पूर्वसंमतीसाठी अडीच हजारांवर शेतकरी प्रतीक्षेत.त्यानंतर कागदपत्रे अपलोड करण्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर पाठविण्यात आला. मात्र, कागदपत्रे अपलोड करताना लाभार्थ्यांना पोर्टल सुरू होण्यासह अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनाही कळवले. .परंतु त्यावर कोणत्याही हालचाली न झाल्याने लाभार्थी शेतकरी अद्याप पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करू शकले नाहीत. तर पोर्टलवर कागदपत्रे अपलोड केलेल्या शेतकऱ्यांच्या लॉगिनला निरंक दाखवत असल्याच्याही तक्रारी आहेत. वेळेत कागदपत्रे अपलोड न केल्याने प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. परिणामी लाभार्थी लाभापासून वंचित राहिले आहेत..MahaDBT : घोळ ‘महाडीबीटी’चा अन् शिक्षा शेतकऱ्यांना .महाडीबीटी पोर्टलवर येणाऱ्या अडचणीकागदपत्रे अपलोड करताना त्यावरून बाहेर पडणेलाभार्थी लॉगिनला छाननीअंतर्गत अर्ज न दिसणेपोर्टलवर कागदपत्रे अपलोड सुविधा न दिसणेकागदपत्रे अपलोड करुनही लॉगिनला निरंक दाखवणेप्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत पूर्वसंमती देताना ॲप्लिकेशन स्टेटस दिसत नसल्यामुळे लाभार्थींचे गट क्रमांक, क्षेत्र, जात व सर्वसाधारण निवड न दिसणेअनेक लाभार्थींचे नॉन आधार प्रोफाईल असल्यामुळे कागदपत्रे अपलोड न होणेआधार लिंक न होणे.कागदपत्रे अपलोड करण्यासाठी १४ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे पोर्टलवर कागदपत्रे जमा करता आली नाहीत. तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आॅपलाइन कागदपत्रे जमा केली आहेत. त्यांच्याकडून आपली निवड रद्द केली नसल्याचे सांगण्यात आले. पण त्याबाबतची खातरजमा होऊ शकली नाही.मैमुनबी शेख, निवड झालेले लाभार्थी शेतकरी, हिरज, ता. उत्तर सोलापूर.१५ दिवसांपूर्वी महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड केली आहेत. मात्र, त्यानंतरही लॉगिनला निरंक दाखवत आहे. याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. पूर्वा वाघमारे, निवड झालेले लाभार्थी शेतकरी, हिरज, ता. उत्तर सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.