Government Schemes: राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान, कडधान्य आत्मनिर्भर अभियान तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान (गळीतधान्य पिके) सन २०२६-२७ अंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत..या कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गळीतधान्य, अन्नधान्य, तृणधान्य, भरडधान्य व कडधान्य पिकांच्या पीक प्रात्यक्षिकांसोबतच प्रमाणित बियाणे वितरण या घटकांचा समावेश करण्यात आला आहे..Maha DBT Scheme: वणीत शेतकरी अडचणीत; शेकडो अर्ज प्रलंबित.या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महा-डीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पीक प्रात्यक्षिके व प्रमाणित बियाणे वितरण या घटकांसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे..Livestock Schemes: ‘पशुसंवर्धन’च्या योजनांची पुनर्रचना; डीबीटीद्वारे अनुदान.जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबिटी पोर्टल वर mahadbt.maharashtra.gov.in संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.डाबरे यांनी केले आहे. .शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेती पद्धती स्वीकाराव्यात तसेच उत्पादनक्षमतेत वाढ करावी, असेही त्यांनी नमूद केले. योजनेंतर्गत मिळणाऱ्या बियाणे व प्रात्यक्षिक सुविधांमुळे शेती उत्पादन वाढीस मोठी मदत होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.