Strawberry Production: महाबळेश्वर तालुक्यात पाणीटंचाईच्या फेब्रुवारी महिन्यापासून जाणवू लागल्याने स्ट्रॉबेरी हंगामास फटका बसू लागला आहे. पाणी टंचाईमुळे सुमारे एक महिना हंगाम अगोदर संपणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे हंगामाच्या २५ ते ३० टक्के उत्पादनात घट होणार आहे. .हंगामात महाबळेश्वर तालुक्यात सुमारे तीन हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड झाली होती. त्याचप्रमाणे वाई, जावळी, कोरेगाव, सातारा या सर्व तालुक्यांत मिळून एक हजार एकरवर लागवड झाल्याचा अंदाज आहे. स्ट्रॉबेरी लागवड वेळेत झाली होती. नोव्हेंबरमध्ये फळधारणा सुरू झाली असताना सलग तीन दिवस तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला होता. .Water Scarcity: वर्ध्यावर पाणीटंचाईचे सावट.पावसामुळे शेतात पाणी साचल्याने रोपे कुजल्याने नुकसान झाले होते. डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष सुरू झाल्यावर दर चांगला मिळण्यास सुरूवात झाली होती. या महिन्यात ४५० ते ५०० रुपये किलोपर्यंत दर मिळाले होते. जानेवारी महिन्यात २०० ते ३०० तर फेब्रुवारीत १०० ते २०० रूपये दरम्यान दर टिकून होते. तसेच प्रक्रियेस जाणाऱ्यास स्ट्रॉबेरी सुरवातीपासून सरासरी ४५ रूपये किलो हा समाधानकारक दर मिळाला आहे..Buldana Water Scarcity: बुलडाणा तालुक्यातील तीन गावांसाठी टँकर मंजूर.हंगाम एप्रिलपर्यंत जाईल असे वाटत असतानात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. यामुळे हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. हंगाम लवकर संपला तर किमान २५ ते ३० टक्के उत्पादनात घट होणार आहे. यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण तसेत उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विहिराची पाणीपातळी घटू लागली आहेत.....अशी आहे स्थितीमहाबळेश्वर तालुक्यात सरासरी तीन हजार एकर, तर इतर तालुक्यात एक हजार एकरवर स्ट्रॉबेरी लागवडहंगामाच्या सुरुवातीस किलोला १०० ते ५०० रुपये मिळाला दरपाणी टंचाई मुळे एक महिना अगोदर संपणार हंगामहंगाम लवकर संपत असल्याने २५ ते ३० टक्के उत्पादनात घटप्रक्रिया जाणाऱ्या स्ट्रॉबेरी सरासरी ४५ रूपये किलो दर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.