Mahabeej Navratri campaign: अकोला- नवरात्रोत्सवाच्या काळात महाबीजच्या विविध बियाणे व कृषी उत्पादनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ११ ते २१ ऑक्टोबरदरम्यान ‘उत्सव नवरात्रीचा, प्रचार महाबीजचा’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे..गणेशोत्सवाच्या काळात राबविण्यात आलेल्या जनसंवाद उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवातील सार्वजनिक उत्सव, धार्मिक कार्यक्रम, उत्सव बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणी महाबीजच्या उत्पादनांची माहिती देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात विविध माध्यमांतून शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यात येणार आहे..Mahabeej Seed Distribution Plan: शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचणार महाबीजचे बियाणे; महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामींची माहिती.अभियानांतर्गत महाबीज-१२४ बीजी-२ कापूस वाण, हरभरा जॅकी-९२१८, महाबीज-१७०८ संकरीत मका, गहू लोक-०१, जीडब्ल्यू-४९६, संकरीत भेंडी-नामी, रब्बी ज्वारी मालदांडी (एम-३५-१), संकरीत वांगे-अनुरूप व चैतन्य, ट्रायकोडर्मा, महाजैविक, कर्बमापक, महास्पीड/साथी पोर्टल, निमास्त्र व महासत्व आदी उत्पादनांचा प्रचार केला जाणार आहे..Mahabeej Mung Variety: ‘महाबीज’च्या ‘उत्कर्ष’ मूग वाणाला न्यायालयाचा दिलासा.महाबीजच्या विविध वाणांची वैशिष्ट्ये, बियाण्यांची उपलब्धता आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती प्रसारित करण्यासाठी नवरात्रोत्सव मंडळांशी समन्वय साधणे, फलक व बॅनर लावणे, ध्वनिक्षेपकाद्वारे माहिती देणे, तसेच डिजिटल माध्यमे, समाजमाध्यमे आणि लघुचित्रफितींचा वापर करण्याचे नियोजन आहे..महाबीजचे विक्रेते, कृषी विभाग आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्या समन्वयातून अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हा व विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी उपक्रमांचे नियोजन करून अंमलबजावणी केली जाणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.