Akola News : शेतकऱ्यांच्या हितासाठी गेली ५० वर्षे अविरत काम करणाऱ्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे आजवरचे हे यश भागधारक शेतकऱ्यांचे आहे, असे प्रतिपादन व्यवस्थापकीय संचालक बुवनेश्वरी एस. यांनी केले. .शनिवारी (ता. २५) येथे आयोजित रब्बी हंगाम कार्यशाळा व महाबीज संशोधित हरभरा वाण लोकार्पण कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर खासदार अनूप धोत्रे, ‘महाबीज’चे संचालक वल्लभराव देशमुख, डॉ. रणजित सपकाळ, प्रयोगशील शेतकरी गणेशराव नानोटे, ‘पंदेकृवि’चे कापूस कृषी विद्यावेत्ता डॉ. संजय काकडे, कृषी विज्ञान केंद्राचे कृषी विद्या विषयतज्ज्ञ संजय उमाळे यांची व्यासपीठावर तर सभागृहात ‘महाबीज’चे महाव्यवस्थापक प्रफुल्ल लहाने, विजय देशमुख, विवेक ठाकरे, श्री. पागृत, विनय वर्मा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान हरभऱ्याच्या तोरण २००६ आणि विकी २००२ या वाणांचे लोकार्पण झाले..श्रीमती बुवनेश्वरी एस. म्हणाल्या, की महाबीजने सारथी पोर्टलवर आपले सर्व बियाणे उपलब्ध करून दिले आहे. आता को-मार्केटिंगवर भर देणे सुरू केला आहे. या हंगामापासून महाबीज मसाल्यामध्ये उतरत आहे. बाजारात गुणवत्तापूर्ण उत्पादनाला मोठा वाव असून अनेक कंपन्यांना असे उत्पादन मोठ्या प्रमाणात हवे असते. .Mahabeej: ‘महाबीज’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी बुवनेश्वरी एस..त्यामुळे पुढील काळात महाबीज मार्केटिंगवर भर देईल. वाशीम जिल्ह्यात चियासीड हे नवीन पीक रुजवल्यापूर्वी आपण त्यासाठी मार्केट शोधली. नंतर शेतकऱ्यांना पेरण्याचा सल्ला दिला. याच पद्धतीने आता महाबीजही काम करेल. शेतकऱ्यांनी दर्जामध्ये कुठेही तडजोड होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. हेल्दी कन्झ्युमर, वेल्दी फार्मर ही संकल्पना त्यातून साकारता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली..खासदार धोत्रे म्हणाले, की ‘महाबीज’ने काळाची पाऊले ओळखत नवनवीन तंत्रज्ञान, पीकवाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावेत. हार्वेस्टिंग लाॅस कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जमिनीच्या सुपीकतेलाही प्राधान्य हवे. गावपातळीवर प्रक्रिया उद्योग तयार करून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करावे लागतील, असेही ते म्हणाले..कार्यशाळेत डॉ. संजय काकडे यांनी कापूस अतिघनता लागवड तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढीबाबत सविस्तर माहिती दिली. संजय उमाळे यांनी आगामी रब्बी हंगामात हरभरा लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. गणेश नानोटे यांनी मातीचे आरोग्य जपत शाश्वत उत्पादन कसे काढता येईल, या बाबत स्वतःचा अनुभव मांडला. वल्लभराव देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. जी. देशमुख यांनी केले. राजेश पाटील यांनी आभार मानले..Mahabeej Seeds: रब्बी हंगामासाठी ‘महाबीज’चे यंदा ४ लाख क्विंटल बियाणे.पीक/वाणांचे बियाणे शेतकरी बांधवांना उपलब्धकार्यशाळेत डॉ. सपकाळ यांनी महाबीजच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालींचा आढावा घेत महामंडळामार्फत अधिक उत्पादनशील गुणवत्तापूर्ण विविध पीक/वाणांचे बियाणे शेतकरी बांधवांना उपलब्ध करुन दिल्यामुळे उत्पादनात वाढ होऊन जीवनमान उंचावण्यात निश्चितच मदत होत आहे असे सांगितले..प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण, एनएबीएल (NABL) संस्थेचे मानांकन प्रक्रिया, संशोधन व विकास विभागामार्फत बदलत्या हवामानास अनुकूल व शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन २२ पिकांमध्ये सुरू असलेल्या संशोधनात्मक कार्याचा आढावा घेतला. यामध्ये चिया या पिकाचा सुद्धा समावेश करण्यात आल्याची माहिती दिली. महाबीजच्या पैलपाडा केंद्रात देशी वाणांच्या बियाण्यांचे जतन करण्याकरिता महाबीज बियाणे बँक सुरू करण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.