Akola News: महाराष्ट्र शासन अंगीकृत उपक्रम असलेल्या राज्य बियाणे महामंडळाला पुन्हा एकदा पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक मिळण्यात अडचणी येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यमान व्यवस्थापकीय संचालक योगेश कुंभेजकर यांची बुधवारी (ता.२०) वाशीम जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली. .श्री. कुंभेजकर यांचा कार्यकाळ एक वर्षाचाही पूर्ण झाला नाही. दुसरीकडे अकोल्याला नव्या जिल्हाधिकारी म्हणून वर्षा मीना रुजू झाल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातील बदल्यांना वेग आला असून, त्याचाच भाग म्हणून ही बदली झाल्याचे सांगितले जात आहे..Mahabeej : बीजोत्पादकांच्या खात्यात महाबीजकडून दोन कोटी जमा.वाशीमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांची महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली आहे.कुंभेजकर १७ सप्टेंबर २०२४ रोजी महाबीजमध्ये रुजू झाले होते. गेल्या ११ महिन्यांत त्यांनी प्रशासन सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली..शिस्तप्रियतेसाठी ओळखले जाणारे श्री. कुंभेजकर यांनी बहुतांश कामकाज पेपरलेस करण्यावर भर दिला. बीजोत्पादन, बियाणे वितरणासह महत्त्वाच्या कामांना त्यांनी प्राधान्य दिले. नुकतेच त्यांनी आयएएसचे महिनाभराचे प्रशिक्षण पूर्ण करून काही दिवसांपूर्वीच कार्यभार स्वीकारला होता..Mahabeej Seed : ‘साथी’मुळे महाबीज बियाणे पुरवठ्यात आघाडीवर.त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रशासनाची घडी बसत असल्याने ते या पदावर आणखी काही महिने राहायला हवे होते, अशा प्रतिक्रिया महाबीज वर्तुळात उमटत आहेत. वाशीम जिल्हाधिकारी म्हणून बुवनेश्वरी एस. यांचा कार्यकाळ लक्षवेधी ठरला. त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांसाठी झोकून देत काम केले..त्यांनी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून वाशीम जिल्ह्याला राज्य व केंद्रस्तरावर मान्यता मिळवून दिली. त्यांच्या बदलीमुळे वाशीम जिल्ह्यात नाराजी व्यक्त होत आहे. भूमिपुत्र शेतकरी संघटनेने ही बदली रद्द करण्याची मागणी शासनाकडे केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.