Palghar News: पाचगणी, महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरीची जव्हार, मोखाडा तालुक्यासह डहाणू भागात प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक घडी बसण्यास मदत होत आहे. .महाबळेश्वर स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असले तरी पालघरवासी स्ट्रॉबेरीची लागवड करून खाण्यासाठी तसेच विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. मात्र, स्ट्रॉबेरी आता पालघर जिल्ह्यातील शेतकरी उत्पादित करू लागले असून, त्यांच्या शेतातील लालचुटुक स्ट्रॉबेरी विक्रीसाठी दाखल झाली आहे. आसनगावच्या कृषी तंत्र विद्यालयात यंदा स्ट्रॉबेरीच्या एक हजार रोपांची प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली आहे..Mahabaleshwar Strawberry: ‘जीआय टॅग स्ट्रॉबेरी’वरून शेतकरी आक्रमक.वाणगाव, डहाणू, बोईसर तसेच ग्रामीण भागातही स्ट्रॉबेरीला मोठी मागणी असल्याने विक्री होत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात स्ट्रॉबेरीची लागवड करावी. लागवड उशिरा झाल्यास फळधारणेलाही उशीर होतो..Mahabaleshwar Strawberries Cultivation : मानराळावरील स्ट्रॉबेरीला बहरली कष्टाची गोड फळे.पारंपरिक फळे, भाजीपाला, फुलशेती पिकासोबतच दुर्मीळ पिकांच्या लागवडीचा प्रयोग कृषी विद्यालयात यशस्वी झाला आहे. जिल्ह्यातील हवामान स्ट्रॉबेरी पिकास पोषक असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी पिकांची लागवड करावी.- मिलिंद पाटील, शेतीमित्र, आसनगाव.आधुनिक शेतीचे ज्ञान उपलब्ध झाल्यामुळे नोकरीपेक्षा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रबळ झाला आहे. स्ट्रॉबेरी पिकासाठी जिल्ह्यातील हवामान पोषक असल्याने स्ट्रॉबेरी पिकाचे तंत्रज्ञान स्वतःच्या शेतीमध्ये वापरून गाव खेड्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे.- नीलम पडवळे, विद्यार्थिनी (कृषी).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.