Agri AI Policy: महाॲग्री-एआय धोरणांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ॲग्रीटेक नावीन्यता केंद्राच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर मंत्रालय स्तरावरील उपसचिव किंवा सहसचिव स्तराच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णय रखडला आहे. .कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढ करण्यासाठी महाॲग्री एआय धोरण २०२५-२९ आणले आहे. या अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ॲग्रीटेक नावीन्यता केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या संचालनासाठी व्यवस्थापकीय संचालक नियुक्तीची तरतूद करण्यात आली होती. हे पद या केंद्राचे प्रमुख असून संचालन आणि वित्तीय अधिकार या पदाला देण्यात आले होते..Agriculture Department: आकृतिबंधामुळे कृषी विभागाला नवी संस्थात्मक रचना.हे पद प्रथम बाह्यस्रोताद्वारे नियुक्त करण्यात येणार होते. त्यासाठी जाहिरात काढून मुलाखतीद्वारे एका अधिकाऱ्याची निवडही केली होती. मात्र, संबंधित व्यक्तीला रुजू न करून घेता हे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. या पदाचा कार्यभार सध्या कृषी विभागातील एका उपसचिवांकडे आहे..या पदावर बाह्यस्रोतांद्वारे व्यक्तीची निवड केल्यास अन्य विभागांशी त्यांना समन्वय साधणे कठीण जाईल, तसेच त्यांना डाटा संकलनात अडचणी येतील त्यामुळे मंत्रालयीन स्तरावरील उपसचिव किंवा सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची निवड करावी, असा प्रस्ताव सुकाणू समितीसमोर मांडण्यात आला. तेथे मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव २८ जुलै रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला. मात्र एक महिन्यांनंतरही या पदासाठी जाहिरात काढण्यात आलेली नाही..Maharashtra Cabinet Decision: मुद्रांक शुल्क माफ ते कृषी विभागात पदांची निर्मिती, मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय.मंत्री अनभिज्ञतत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण मंजूर करण्यात आले. मात्र, या धोरणाची अंमलबजावणी कृषी विभागातील अधिकारी आपल्या पद्धतीने करत आहेत. ‘सीईओ’ पदासाठी निकष ठरविण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीआधी प्रस्ताव समोर आल्यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना त्याबाबत माहिती मिळाल्याचे समजते. मंत्री कार्यालयाशी संपर्क साधला असता, या बाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. .मात्र, ज्यावेळी प्रस्ताव समोर आला त्यावेळी केवळ कृषी विभागातील उपसचिव दर्जाचा अधिकारी या पदावर नियुक्त करावा, असे नमूद करण्यात आले होते. त्यात बदल करून मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रालय स्तरावरील उपसचिव किंवा सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, असा बदल करण्यात आला..व्यवस्थापकीय संचालक पदाच्या नियुक्तीसाठी पुढील प्रक्रिया सुरू करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. मात्र, अद्याप त्याबाबत निर्देश आलेले नाहीत. मान्यता मिळताच जाहिरात प्रसिद्ध करून पुढील प्रक्रिया करण्यात येईल.श्रीकांत आंडगे, उपसचिव, कृषी विभाग, तथा प्रभारी व्यवस्थापकीय संचालक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.