Pune News : महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पाच्या (मॅग्नेट) दुसऱ्या टप्प्यातील अंमलबजावणी जागतिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून प्रभावीपणे करावी. देशाअंतर्गत तसेच जगाच्या बाजारपेठेत शेतीमालाला स्पर्धात्मक दर मिळण्यासाठी प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीमालाची प्रभावी मूल्यवर्धन साखळी तयार करावी. .नागरिकांच्या जीवनमानात परिवर्तन करणारा प्रकल्प असून बियाणांपासून ते उत्पादन आणि त्याच्या विक्रीपर्यंत कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना मॅग्नेट प्रकल्पाचे अध्यक्ष आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केल्या..मॅग्नेट प्रकल्प १ आढावा आणि टप्पा क्रमांक २ च्या नियोजन आढावा बैठकीत नुकतेच मंत्री रावल बोलत होते. या वेळी केंद्रीय कृषी मंत्रालयाचे विपणन व तपासणी संचालनालयाचे विपणन अधिकारी व्ही. एस. यादव, पणन संचालक विकास रसाळ, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, मॅग्नेटचे प्रकल्प संचालक आणि पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे, ‘नाबार्ड’चे उपमहाप्रबंधक हेमंत कुंभारे आदी उपस्थित होते..श्री. रावल म्हणाले, की राज्यातील डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची, आंबा, काजू, लिंबू व पडवळ आणि द्राक्ष, पपई, हळद, आले, अंजीर, शेवगा, टोमॅटो या फलोत्पादन पिकांच्या व फुलांच्या मूल्यसाखळ्यांमध्ये खासगी गुंतवणुकीला आकर्षित करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करावी..Jaykumar Rawal: ‘एनआयपीएचटी’मध्ये जागतिक पातळीवरील प्रशिक्षण द्या.फळे व भाजीपाल्याचे काढणीपश्चात नुकसान कमी करणे व स्पर्धात्मक दर मिळवण्यासाठी शितगृहाची साठवणूक क्षमता वाढविण्यावर भर द्यावा. उत्पादन काढणीनंतर साठवणुकीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा.ते म्हणाले, की शेतकरी उत्पादक संस्थांची मूल्य साखळी गुंतवणूकदार व सहभागी घटकांची संस्थात्मक क्षमता वाढ करण्यास प्राधान्य देण्यात यावे. शाश्वतता आणि हवामान अनुकूल व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, बाजारपेठ व निर्यातभिमुख शेती व्यवसायाचा विकास करावा. जागतिक मागणीनुसार निर्यात सुविधा केंद्रे विकसित करावीत. विभागीयस्तरावर प्रयोगशाळा निर्माण केल्या पाहिजेत..शेतकऱ्यांच्या उत्पादित शेतीमालाचे मूल्यवर्धन करून जलद पुरवठा साखळीच्या माध्यमातून देशाबरोबरच जागतिक बाजारपेठेत शेतीमाल स्पर्धात्मक दरात विकला जाईल याकरिता सुविधा विकसित करण्याचे नियोजन करावे. शेतीमालाची नासाडी टाळून तो अधिक काळ टिकला पाहिजे, यादृष्टीने कार्यवाही करावी. काढणी पश्चात, वर्गीकरण, प्रतवारी (ग्रेडिंग), पॅकेजिंग, मालाचे मूल्यवर्धन, साठवणूक ही साखळी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सक्षम करावी, असे त्यांनी सांगितले..Jaykumar Rawal: पणन विभागाची पुनर्रचना काळाची गरज : पणनमंत्री रावल.आधुनिक तंत्रज्ञानाची निवड, वापर करावाते म्हणाले, की राज्यात उच्च तंत्रज्ञानयुक्त रोपवाटिकांची निर्मिती करून त्यामध्ये फळपिकांची दर्जेदार रोपे तयार करावीत. याद्वारे उच्च दर्जाच्या आणि निर्यातक्षम कृषी उत्पादनांची वाढ होण्यास मदत होईल. .मॅग्नेट प्रकल्पामध्ये सौरऊर्जा आधारित शीतगृह, सोलर कंडक्शन ड्रायर, ट्रककरिता रिचार्जेबल रिफर कंटेनर, बायोमास आधारित शीतगृह माती परीक्षण यंत्र, माहिती तंत्रज्ञानावर आधारित डिजिटल शेती सल्ला, ड्रोनद्वारे रसायनांची फवारणी, मिनी ऑप्टीकल ग्रेडर, उपग्रहआधारित शेती सल्ला, सीताफळ पल्प यंत्र, बाष्पोत्सर्जन आधारित कूल चेंबर, सौर कीटक सापळा अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाची निवड करून वापर करावा.बैठकीत श्री. कोकरे यांनी आशियाई विकास बँक अर्थसाहाय्यित ‘मॅग्नेट’ प्रकल्प १ आढावा आणि टप्पा २ च्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.