किसान से किसान तक उपक्रम ‘माफसू’ राबवणार

कुलगुरू कर्नल डॉ. आशिष पातुरकर यांची माहिती
Mafsu College
Mafsu CollegeAgrowon

नागपूर : आता काळ बदलला आहे. देशभरातील (Country) उत्तमोत्तम महाविद्यालयात (College) उच्च शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी ज्ञान वाढवावे, नवीन कौशल्ये आत्मसात करावी यासाठी माफसूतर्फे ऑफलाइन व ऑनलाइन (Online, Offline) पद्धतीने कौन्सिलिंग करण्यात येत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी अन्य राज्यांतील नावाजलेल्या संस्थांमधून दर्जेदार शिक्षणासाठी पात्र ठरत आहे. माफसूतर्फे (MAFSU) लवकरच ‘किसान से किसान तक’ उपक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना माफसूतील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील, विचारांचे आदान प्रदान होईल. मग यातील प्रशिक्षण घेतलेला शेतकरी (Farmer) त्याच्या गावात जाऊन इतर शेतकऱ्यांना त्यांना समजेल अशा त्यांच्याच भाषेत माहिती देईल. यामुळे क्लिष्टता टाळून नेमक्या समस्यांवर उपाययोजना करणे सोपे जाईल, असे महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे (माफसू) कुलगुरू कर्नल डॉ. आशिष पातुरकर (Vice-Chancellor Colonel Dr. Ashish Paturkar) यांनी सांगितले.

Mafsu College
शेतकरी, व्यापाऱ्यांकडे ६७ लाख टन सोयाबीन

माफसूला २०२०-२१ करिता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या समुपदेशनात देशातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. यानिमित्ताने माफसूची आगामी वाटचाल, संशोधन आणि पशुपालकांच्या उत्पन्नवाढीसंदर्भात कुलगुरू डॉ. पातुरकर यांनी विद्यापीठाच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी केलेल्या समुपदेशनासाठी माफसूला प्रथम क्रमांक मिळाला आहे. राष्ट्रीय पातळीवरील पशुवैद्यकीय महाविद्यालय (National Level Veterinary College) आणि मत्स्य विज्ञान महाविद्यालयांतून माफसू अव्वल ठरले आहे. माफसूला मिळालेल्या या यशाचे श्रेय तळमळीने आणि निष्ठेने शिक्षण व संशोधन कार्य करणाऱ्या शिक्षक व संशोधकांना असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. स्पर्धेत उतरून आपले नाणे खणखणीतपणे वाजवणाऱ्या महाराष्ट्रातील (Maharashtra) विद्यार्थ्यांचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असे ते म्हणाले.

समुपदेशन पक्रियेबाबत माहिती देताना कुलगुरू म्हणाले, की पारंपरिक पद्धतीनुसार पदवी मिळविणे, तेथूनच पदव्युत्तर पदवी व शक्य झाल्यास आचार्य पदवी असे स्वरूप आहे. आता काळ बदलला आहे. देशभरातील उत्तमोत्तम महाविद्यालयात उच्च शिक्षण (High Education) घेऊन विद्यार्थ्यांनी ज्ञान वाढवावे, नवीन कौशल्ये आत्मसात करावी यासाठी माफसूतर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कौन्सिलिंग करण्यात येत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी अन्य राज्यांतील नावाजलेल्या संस्थांमधून दर्जेदार शिक्षणासाठी पात्र ठरत आहेत.
विदर्भातील गवळावू गायींचे संगोपन करून त्यांना कृत्रिम रेतन पद्धतीने भरविले जाते. यासाठी देशी प्रजातीतील वीर्यवान जनावर उपयोगात आणले जाते. यामुळे गाय गाभण राहून गायींची संख्या वाढावी व त्यांचे दुधाचे प्रमाणही वाढावे असा प्रयत्न आहे. माफसूतील प्रयोगशाळेत जर्मप्लाझम, एम्ब्रियो ट्रान्स्फर संबंधित कामे प्रगतिपथावर आहेत.
पशुपालकांच्या उत्पन्नवाढीसाठी (increase the income of pastoralists) राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांबाबत कुलगुरु म्हणाले की, पशुपालकांसमोर अनेक अडचणींचे डोंगर उभे आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी उतर पूरक व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे. नवीन तंत्रज्ञान व संशोधनाद्वारे खर्च कमी करून उत्पन्न व उत्पादनवाढीसाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. शासकीय योजनांचीही माहिती दिली जात आहे.

‘किसान से किसान तक’
अडचणी, समस्या अनेक आहेत. माझ्या मते सुसंवादाची प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. कारण तांत्रिक अंगाने सांगितले किंवा खूप ज्ञानी असल्याचा आव आणून सांगितलेले शेतकऱ्यांच्या पचनी पडेलच असे नाही. यासाठी ‘किसान से किसान तक’ उपक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना माफसूतील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील, विचारांचे आदान प्रदान होईल. मग यातील प्रशिक्षण घेतलेला शेतकरी (Farmer) त्याच्या गावात जाऊन इतर शेतकऱ्यांना त्यांना समजेल अशा त्यांच्याच भाषेत माहिती देईल. यामुळे क्लिष्टता टाळून नेमक्या समस्यांवर उपाययोजना करणे सोपे जाईल, असे कुलगुरू म्हणाले.

विद्यापीठाचे कार्य शिक्षणापुरतेच मर्यादित न राहता संशोधन व विस्तार कार्यावरदेखील भर दिला जात आहे. देशी गाईंचे संगोपन व संरक्षण करून उत्पादकता वाढ व पशुपालकांच्या उत्पन्नवाढीसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत.

- डॉ. आशिष पातुरकर, कुलगुरू, माफसू

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com