Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत एप्रिलपासून आतापर्यंत लम्पी स्कीन आजारामुळे सुमारे २११ पशुधनाला जीव गमवावा लागला आहे. लम्पी बाधित जनावरांची संख्या अजूनही कायम आहे. त्यासाठी उपाय योजले जात असले तरी धोका अजून टळलेला नसल्याची स्थिती आहे.या तीन जिल्ह्यांत लम्पीमुळे आतापर्यंत सुमारे ४२६३ पशुधन बाधित झाले होते. त्यापैकी ३५०७ पशुधन उपचाराने बरे झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली..छत्रपती संभाजीनगरमध्ये ८६ पशुधन दगावलेछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत लम्पी आजाराचा उद्रेक आजवर थोडा जास्त होता. जिल्ह्यात तब्बल २०४० पशुधनाला लम्पीची बाधा झाली होती. त्यापैकी १६५७ पशुधन आजारातून बरे झाले. तर ८६ पशुधनाला या आजारामुळे जीव गमवावा लागला. पशुसंवर्धन विभागाच्या १० नोव्हेंबरपर्यंतच्या अहवालानुसार, जिल्ह्यात २९७ पशुधनाला लम्पीची बाधा असून त्यामध्ये ११६ अल्प तर ११४ पशुधनाला मध्यम प्रमाणात बाधा झालेली आहे. सुमारे ६७ पशुधन अजूनही तीव्र लक्षणाची असल्याचे तसेच त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून कळविण्यात आले..Lumpy Skin Disease: लंम्पी त्वचा आजार बाधित गोवंशाचे व्यवस्थापन.जालना जिल्ह्यात ६७ पशुधनाचा मृत्यूजालना जिल्ह्यातील गोवर्गीय पशुधनांची संख्या ४२१९७५ इतकी आहे. या सर्वांना लसीकरण करण्यात आले असले तरी जवळपास ६७ पशुधनाचा लम्पीमुळे मृत्यू झाला आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यात लागण झालेल्या पशुधनाची संख्या १३२० इतकी आहे. आताच्या घडीला सुमारे ४५ पशुधनाची बाधित म्हणून नोंदली गेली आहेत. या वेळी वासरे व लहान जनावरांवर प्रादुर्भाव जास्त होता.जालना जिल्ह्यातील भोकरदन, जालना व बदनापूर तालुक्यांत लम्पी आजाराचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळून आला. एप्रिलमध्ये पहिले बाधित पशुधन आढळल्यानंतर नियंत्रणासाठी शिफारशीत उपायांचा अवलंब करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त पी. डी. चौधरी यांनी दिली..Lumpy Skin Disease: लसीकरणानंतरही लम्पी का थांबेना?.बीड जिल्ह्यात ५८ दगावलीबीड जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार, आजपर्यंत बाधित पशुधन ९०३ इतके आहे. तर उपचाराने बरे झालेल्या पशुधनाची संख्या ६४२ इतकी आहे. जवळपास ५८ जनावरांचा मृत्यू झाला आहे. आताच्या घडीला उपचाराधीन पशुधन संख्या २०३ इतकी आहे..अशी घ्या दक्षतालम्पी स्कीन या आजाराचे नियंत्रण करण्याकरिता आपला गोठा स्वच्छ ठेवावा, सायंकाळी लिंबाच्या पाल्याचा धूर करावा, जेणे करून डास, माशा यांच्या चावा घेण्यापासून पशुधनाचा बचाव करता येईल. तसेच गोठ्यांमध्ये कीटकनाशक फवारणी करून घ्यावी. पशुधनावर ताण येणार नाही याची दक्षता घ्यावी. आपले पशुधन आजारी पडल्यास तत्काळ नजीकच्या पशूवैद्यकीय चिकित्सालयातील अधिकारी व कर्मचारी यांना कळवून उपचार करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे..बीडमध्ये ३.४० लाख पशुधनाचे लसीकरण बीड जिल्ह्यात एकूण गोवर्गीय पशुधन संख्या ३४११३५ इतकी आहे. जिल्ह्यात आजअखेर ३४०३०० जनावरांचे लसीकरण झाले आहे. लम्पी चर्म रोग लसीकरण मोहिमेदरम्यान गाभण, नवीन जन्मलेली वासरे व आजारी पशुधन लसीकरणापासून वंचित होते. त्यांचे लसीकरण करण्याकरिता प्रशासनाकडून मागणीनुसार २५००० लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.