Gas Cylinder Price Today News Updates: देशात व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात सरासरी ९९३ रुपयांची वाढ झाली आहे. ही दरवाढ आज शुक्रवार १ मे २०२६ पासून लागू करण्यात आली. अमेरिका-इराण-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सिलिंडर महागला आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ आहे. याची झळ हॉटेल, रेस्टॉरंट्स व्यवसायिकांना बसणार आहे. याचा परिणाम म्हणून हॉटेलमधील जेवण महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. .विशेष म्हणजे चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर लगेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली. दरम्यान, घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ केलेली नाही. दिल्लीत १४.२ किलो वजनाच्या घरगुती सिलिंडरचा दर ९१३ रुपये इतका कायम आहे, असे इंडियन ऑइलने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे..India LPG Crisis : एलपीजी वाहतूक करणाऱ्या इराणच्या जुन्या जहाजाला भारताने दिली नियमातून सूट?.मुंबईत सिलिंडर किती रुपयांनी महागला?इंडियन ऑइलने (IOC) जारी केलेल्या नवीन दरांनुसार, दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरचा दर ९९३ रुपयांनी वाढला आहे. यामुळे दिल्लीत आता सिलिंडर २,०७८.५० रुपयांऐवजी ३,०७१.५० रुपयांना मिळेल. त्याचबरोबर, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्येही दर वाढले आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरचा दर ९९४ रुपयांनी वाढून ३,२०२ रुपयांवर पोहोचला आहे. तर मुंबईत सिलिंडर ९९३ रुपयांच्या वाढीसह ३,०२४ रुपयांना मिळेल. याआधी मुंबईत व्यवसायिक सिलिंडरचा दर २,०३१ रुपये होता. तर चेन्नईत ९९०.५० रुपयांनी वाढून सिलिंडर ३,२३७ रुपयांना मिळेल. .LPG Shortage in India: एलपीजी गॅसच्या टंचाईवर केंद्र सरकारने घेतला केरोसीन वाटपाचा निर्णय .तेल विपणन कंपन्यांकडून साधारणपणे प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला एलपीजीच्या दरात बदल केला जातो. याआधी घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडर दरात बदल एप्रिलमध्ये केला होता. मागील महिन्यात १४.२ किलो वजनाच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती. तसेच व्यावसायिक सिलिंडर दरात ७ मार्च रोजी ११४.५ रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १९६ रुपयांनी महागला होता..होर्मुझ सामुद्रधुनीतून जलवाहतूक ठप्प झाल्याने एलपीजी पुरवठ्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी गॅस सिलिंडर दरात मोठी वाढ झाली. होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील २० टक्के कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक होते. पण हा इराणकडून हा मार्ग जवळपास बंद केला आहे. यामुळे पुरवठा थांबला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.