Farmer Debt: कमी पावसामुळे वाढणार शेतीतील थकीत कर्जे; केअरएज रेटिंग्जचा अंदाज
CareEdge Ratings Report: यंदा मॉन्सूनचा पाऊस कमी झाला. त्याचा फटका बँकांच्या शेतीकर्ज वसुलीला बसण्याची शक्यता आहे. खरिपासाठी घेतलेली काही पीककर्जे वेळेत फेडली जाणार नाहीत. त्यामुळे पुढील दीड वर्षात शेतीतील थकीत कर्जे (एनपीए) वाढतील, असा अंदाज केअरएज रेटिंग्जने वर्तवला आहे.