Success Story : चार एकरांत अंबाडी लागवडीचा भन्नाट प्रयोग; कमी खर्चात शेतकऱ्याने कमावला लाखोंचा नफा!
Ambadi Farming : अमरावती पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून शिंदी (परतवाडा) येथील शेतकरी संतोष रोही यांनी चार एकरांत अंबाडी (रोजेल) लागवडीचा प्रयोग केला आहे. कमी उत्पादन खर्च आणि सध्या मिळत असलेला चांगला बाजारभाव यामुळे या पिकातून तीन ते साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.