Monsoon 2026 : परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत यंदा जून-जुलैमधील रिमझिम पाऊस पिकांच्या वाढीसाठी पोषक ठरला होता. त्यामुळे पिके बहरली होती. मात्र, त्यानंतर महिनाभर पावसाचा ताण बसल्याने पिके करपू लागली. ऑगस्टमधील प्रदीर्घ पावसाच्या खंडामुळे होत्याचे नव्हते झाले असून, दोन्ही जिल्ह्यांत दुष्काळाची चाहूल लागली आहे. परिणामी शेतकऱ्यांसमोर अडचणींचे डोंगर उभे राहिले आहेत..यंदा एल निनोच्या स्थितीत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत पावसाचे आगमन उशिरा झाले. पावसाचे वितरणही असमान राहिले. जूनमध्ये पावसाची तूट होती. जुलैअखेरीस झालेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला. मात्र, ऑगस्ट महिन्यात तब्बल २५ ते ३० दिवसांचा पावसाचा खंड पडला. अत्यंत कमी पाऊस झालेल्या मंडलांतील पिके हाती लागण्याची शक्यता धूसर झाली आहे..Vidarbha Rain Alert: विदर्भात वाढणार पावसाचा जोर.सततच्या पाणी उपशामुळे विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावली असून, अनेक ठिकाणी त्या तळ गाठत आहेत. उर्वरित पावसाळ्यात जोरदार पाऊस झाला नाही, तर पिण्याच्या पाण्यासह पशुधनासाठी चारा आणि पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. पेरणी तसेच पीक व्यवस्थापनावर केलेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. हाती काहीच लागण्याची चिन्हे दिसत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत..परभणीत २३२.१, तर हिंगोलीत १५६.६ मिमी तूटयंदाच्या पावसाळ्यात जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत परभणी जिल्ह्यात सरासरी ५९२.३ मिमी पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात ३६०.२ मिमी, म्हणजेच ६०.८ टक्के पाऊस झाला असून, २३२.१ मिमीची तूट आहे. सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ आणि गंगाखेड या तालुक्यांत ऑगस्ट महिन्यात अपेक्षित सरासरीपेक्षा ५० टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात या कालावधीत सरासरी ६४०.६ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४८४ मिमी, म्हणजेच ७५.६ टक्के पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात १५६.६ मिमी पावसाची तूट आहे. हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ आणि सेनगाव तालुक्यांत ऑगस्ट महिन्यात अपेक्षित सरासरीपेक्षा ५० टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे..Crop Loan : पीक कर्जवाटप वाढवा, अन्यथा शासकीय ठेवी काढू.पिकांची अवस्था नाजूकपरभणी जिल्ह्यात ५ लाख १६ हजार ९७ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ४ लाख ९२ हजार ४४३ हेक्टर, म्हणजेच ९५.४१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ५३ हजार ९४९ हेक्टरपैकी ३ लाख ३२ हजार २२९ हेक्टर, म्हणजेच ९३.८६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीन पीक फुलोरा ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. कपाशीचे पीक पाते, फुले आणि बोंडे लागण्याच्या अवस्थेत असून, तूर, ज्वारी आणि बाजरी ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पावसाअभावी जमिनीतील ओलावा नष्ट झाल्याने अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडल्या आहेत. हलक्या जमिनीवरील पिके करपू लागली असून, मध्यम व भारी जमिनीवरील पिके उन्हाच्या तडाख्याने माना टाकत आहेत. हळद आणि ऊस पिकांची वाढ खुंटली असून, किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. पाणी उपलब्ध असतानाही वीजपुरवठा सुरळीत राहत नसल्याने पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही..आमच्या मंडलात यंदा सुरुवातीपासूनच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. मागील महिनाभरापासून पाऊस नसल्याने सोयाबीनचे पीक करपून गेले आहे. कपाशीची वाढ खुंटली असून, ऊसालाही ताण बसला आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून सिंचनाचे आवर्तन सोडण्यास उशीर झाला. कोरडवाहू पिकांची स्थिती अत्यंत गंभीर आहे.- बाबासाहेब रन्हेर, बाभळगाव, ता. पाथरी, जि. परभणी.पावसाने दडी मारल्याने फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेतील सोयाबीन सुकू लागले आहे. फुलगळ होत असून, पाण्याचा ताण बसल्यामुळे उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट येण्याची शक्यता आहे. सद्यःस्थितीत चांगला पाऊस झाला, तर काही प्रमाणात उत्पादन हाती लागेल; अन्यथा काहीच मिळणार नाही. हळदीची वाढही खुंटली असून, उन्हामुळे पाने कोमेजत आहेत. उत्पादनात मोठी घट निश्चित आहे.- शंकर गुट्टे, बेलुरा, ता. जि. हिंगोली.परभणी जिल्हा २०२६ पर्जन्यमान स्थिती (मिमीमध्ये) महिना सरासरी झालेला पाऊस फरकजून १४५. ३ ९४.४ उणे ५०.९जुलै २१९.२ २१०.४ उणे ८.८ऑगस्ट २२७.८ ५५.३ उणे १७२.५ .हिंगोली जिल्हा २०२६ पर्जन्यमान स्थिती (मिमीमध्ये)महिना सरासरी झालेलापाऊस फरकजून १६९.२ १२०.२ उणे ४९जुलै २३०.२ २९०.९ अधिक ६०.७ऑगस्ट २४१.२ ७३.२ उणे १६८.परभणी जिल्हा खरिप २०२६ पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)पीक सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्रसोयाबीन २६१७५७ २६४१२३ १००.९०कपाशी १९०१५८ १८८४४४ ९९.०९तूर ४११४७ ३१०३७ ७७.३८मूग १३८४१ ४९०७ ३५.४५उडिद ५२१५ २०३४ ३९.००ज्वारी ४३३ ३०७४ १४.०८बाजरी ४१९ ६९ १६.४६मका ८६२ २९४ ३४.१० .हिंगोली जिल्हा खरिप २०२६ पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)पीक सरासरी पेरणी क्षेत्र क्षेत्र टक्केवारीसोयाबीन २५८६०९ २५७९७२ ९९.७५कपाशी ३६८०३ ३२३९४ ८८.०२तूर ३९९२५ ३४१७३ ८५.५९मूग ७१८७ ३२०३ ४४.५७उडिद ५५८५ २३३२ ४१.७७ज्वारी ४६११ ७६६ १६.६३बाजरी ३.२० ७ २१८.७५मका ९४८ १६१. ०.१७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.