Nashik News : भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या नेतृत्वात २५ जानेवारी रोजी विविध मागण्या व प्रलंबित प्रश्नांसाठी नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेला ‘लाँग मार्च’ने तिसऱ्या दिवशी ठाणे जिल्ह्यात प्रवेश केला. नाशिक जिल्ह्यात जवळपास ५५ हजार मोर्चेकऱ्यांसोबत अहिल्यानगर, ठाणे व पालघर जिल्ह्यांतील नेते व कार्यकर्ते यात सहभागी झाले आहेत. .पहिला मुक्काम रविवारी (ता.२५) राजूर बहुला येथे झाल्यानंतर दुसरा मुक्काम सोमवारी (ता.२६) घाटणदेवी येथे झाला. मंगळवारी (ता.२७) सकाळी ७ वाजता लाँग मार्च कसारा घाट उतरण्यास सुरुवात होणार होती..Long March: मुख्यमंत्र्यांनी घेतली लॉन्ग मार्चच्या मागण्यांच्या अंमलबजावणीची हमी; मोर्चेकर्यांशी बोलून अंतिम निर्णय, किसान सभेची भूमिका.दरम्यान नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे यांनी मोर्चेकरांची भेट घेत मुंबईतील बैठक होऊ द्या त्यानंतर मोर्चा सुरू करा, असा प्रस्ताव मांडला. मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत थांबणार नाही. मुंबईकडे जाणार अशी ठाम भूमिका घेतली..Long March: मागण्या मान्य न झाल्याने किसान सभेचा लॉंग मार्च मुंबईच्या दिशेने; राज्य शासनासोबतची चर्चा निष्फळ.या मोर्चात पुढे पालघरच्या मोर्चाचे नेते आमदार विनोद निकोले, किरण गहला, रडका कलंगडा, चंद्रकांत घोरखाना आणि ठाणे-पालघर जिल्ह्यातील इतर कार्यकर्ते, तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ यांसह नेते व कार्यकर्ते सामील झाले. मंगळवारी दुपारी ४ वाजता लाँग मार्चने ठाणे जिल्ह्यात खर्डीजवळ प्रवेश केला..आंदोलकांचा नाशिक-मुंबई महामार्गावरच प्रजासत्ताक दिनसोमवारी (ता.२६) सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त मोर्चाच्या सर्वांत पुढच्या ट्रकवर राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक फडकवण्यात आला. यावेळी तिरंग्याला पुष्प अर्पण करून आदराने सलामी देण्यात आली. यावेळी हजारो मोर्चेकरी उपस्थित होते. हा सर्व कार्यक्रम नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरच पार पडला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.