Lonar Lake Water Level Rise: बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याला कारण लोणार सरोवरापासून ३६ किलोमीटरवरील येलदरी धरण असू शकते, अशी शक्यता राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (निरी) वर्तविली आहे. त्यामुळे, याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मत ‘निरी’तर्फे व्यक्त करण्यात आले आहे..वाढत्या पाण्याच्या पातळीवर वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या विविध वृत्तांची दखल घेत न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या समक्ष सुनावणी झाली. लोणार सरोवरातील वाढती जलपातळी चिंतेचा विषय असून यावर उपाययोजना शोधण्यासाठी सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. यात निरीचाही सहभाग आहे. अलीकडेच समितीची बैठक झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. यात निरीने या धरणाच्या बॅक वॉटरमुळे काही नवे जलस्त्रोत निर्माण झाल्याची शक्यता वर्तविली. त्यामुळे लोणार सरोवरातील गोड्या पाण्याचा स्तर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विषयावर सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मत निरीने व्यक्त केले. याखेरीज अन्य संस्था व त्यांच्या प्रतिनिधींनीसुद्धा आपआपली मते व्यक्त केली..Lonar Lake Issue: ‘लोणार’च्या समस्येवर तोडग्यासाठी समिती.या महिन्यात आयआयटीतर्फे अभ्यासविश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (व्हीएनआयटी) स्थापत्य विभागाकडून काही तपासण्या सूचविण्यात आल्या आहेत. यात बेसलाईन सर्वे, पाण्याचा समतोल मोजण्यासाठी फिजोमिटर लावण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच, हायड्रोलॉजिकल संशोधन करण्याचीही सूचना देण्यात आली आहे. याशिवाय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबईची चमू देखील या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी येत्या महिन्यात लोणार येथे येणार आहे..Lonar Lake: ‘लोणार’चा प्रवाह संतुलित ठेवण्यासाठी उपाय काय?.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.