Tamarind Farming: लोहगाव परिसरात पूर्वजांनी खळवाडी व शेतशिवारात लावलेली अनेक वर्षे जुनी, डेरेदार चिंचेची झाडे यंदा अकोट चिंचेच्या फळांनी लगडली आहेत. गुढीपाडव्यापासून व्यापाऱ्यांनी झाडांची झोडणी सुरू केल्याने अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे..उन्हाची तीव्रता वाढत असताना लोहगाव ते मावसगव्हाण, लामगव्हाण, गाढेगाव, तोडोळी, कदम वस्ती, खळवाडी तसेच पाणंद रस्त्यांच्या दुतर्फा अनेक वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी लावलेल्या चिंचेच्या झाडांना यंदा भरपूर फळधारणा झाली आहे..Tamarind Price: अहिल्यानगरमध्ये चिंचेला प्रति क्विंटल २५००० रुपये दर.काही व्यापाऱ्यांनी फुलोऱ्याच्या अवस्थेतच या झाडांचे सौदे केले होते. आता या झाडांवर गोड-आंबट अकोट चिंच मोठ्या प्रमाणात पिकली असून बाजारात चिंचेची मागणी वाढल्याने दरही चांगले मिळत आहेत..Tamarind Prices: शिरूर बाजारात चिंचेला मोठी मागणी; दर ११,००० रुपयांपर्यंत पोहोचले.हिंदू नववर्ष गुढीपाडव्यापासून व्यापाऱ्यांनी झाडांवरील चिंACचेची झोडणी सुरू केली आहे. त्यामुळे पुरुषांना झोडणीचे काम मिळत असून महिलांना चिंचा वेचणे,.जमा करणे व फोडणे या कामांत रोजगार मिळत असल्याचे चित्र लोहगाव परिसरात पाहायला मिळत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.