Nanded News: नांदेड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी (ता.२) एकूण २९१ मतदान केंद्रांवर ७४.७५ टक्के मतदान झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी थेट आणि अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. मतदानानंतर राजकीय पुढारी, उमेदवारांसह कार्यकर्त्यांनीही आकडेमोडीला सुरवात केली आहे. कोण बसणार नगराध्यक्षपदाच्या खुर्चीत? या प्रश्नांची उत्तरे आता येत्या २१ डिसेंबरला स्पष्ट होणार असून, राजकीय वातावरण तापले आहे..मुखेड आणि धर्माबाद या दोन नगरपरिषदांच्या निवडणुका न्यायालयाच्या निर्णयामुळे २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याने निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. त्यामुळे ‘कौन बनेगा नगराध्यक्ष?’ या चर्चेला जनमानसात उधाण आले आहे. काही मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत मतदानाची गडबड सुरू होती. आता मतदार आणि उमेदवार दोघेही २१ डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीच्या प्रतीक्षेत आहेत..Local Boyd Elections: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना सज्ज....अशा होतील थेट लढतीभोकरमध्ये भाजपचे भगवान दंडवे काँग्रेसचे संदीप पा. गौंड यांच्यात लढत होणार असे दिसून येत आहे. उमरीमध्ये राष्ट्रवादीकडून शकुंतला मुदिराज विरूद्ध भाजपच्या स्वप्ना माचेवाड, हदगावमध्ये शिवसेनेच्या रोहिणी वानखेडे विरुद्ध काँग्रेसच्या कुमुद सोनुले, किनवटमध्ये भाजपच्या पुष्पाताई मच्छेवार विरुद्ध शिवसेना (यूबिटी) च्या सुजाता एंड्रलवार, देगलूरमध्ये भाजपच्या नीलाबाई भांगे विरुद्ध काँग्रेसच्या मनोरमा नीलमवार, कुंडलवाडीत राष्ट्रवादीचे डॉ. विठ्ठलराव कुडमुलवार विरुद्ध भाजपच्या प्रेरणा कोटलावार, मुदखेडमध्ये विश्रांती माधवराव कदम (भाजप) विरुद्ध शीलाताई राजबहादूर कोत्तावार (काँग्रेस) यांच्यात लढत होईल..Local Body Elections: नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबरलाच जाहीर करा ; सुप्रीम कोर्ट.तर हिमायतनगर नगरपंचायतीत भाजपचे डॉ. राजेंद्र वानखेडे यांच्या विरुद्ध काँग्रेसचे शेख रफिक शेख यांच्यात अटीतटीची लढत असल्याचे दिसून येते. लोहा नगरपरिषदेमध्ये शरद पवार, गजानन सूर्यवंशी यांच्यात मुख्य लढत आहे. तर कंधारमध्ये स्वप्नील लुंगारे विरुद्ध पिंटू यन्नावार यांच्यात लढत रंगली. बिलोलीमध्ये चौरंगी लढत रंगल्याचे दिसून आले. यात शहर विकास आघाडीकडून संतोष कुलकर्णी, काँग्रेसच्यावतीने भरत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रजित तुडमे आणि शिवसेनेचे विजयकुमार कुंचेनवार यांच्यात ही लढत रंगली..नगराध्यक्ष पदाच्याउमेदवारांची संख्यानगराध्यक्षपदासाठी किनवटमध्ये ८, बिलोलीमध्ये ९, भोकरमध्ये ९, कुंडलवाडीमध्ये ४, लोहामध्ये २, कंधारमध्ये ३, हिमायतनगरमध्ये ७, उमरीमध्ये ९, हदगावमध्ये ४, मुदखेडमध्ये १०, देगलूरमध्ये ५ उमेदवार स्पर्धेत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.